Tuesday, October 22, 2024
Homeक्राइमधक्कादायक ! मतदान केंद्राजवळ तरुणाची चाकूने वार करत हत्या

धक्कादायक ! मतदान केंद्राजवळ तरुणाची चाकूने वार करत हत्या

धाराशिव लोकसभा मतदारसंघात भूम तालुक्यात पाटसांगवी येथे मतदान केंद्राजवळ एकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. राजकीय वादाचे रुपांतर हत्येत झाल्याने भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.समाधान पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. घटना घडून गेल्यावर आरोपीने तेथून पळ काढला आहे.

मंगळवारी (दि.७) राज्यातील ११ लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. मात्र तिसऱ्या टप्प्यात या निवडणुकीला गालबोट लागले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्राजवळ एका तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे दोन गटात मंगळवारी राडा झाला. त्यातून दोन गट आपसात भिडले. यामध्ये एकाची हत्या झाली असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून दोन गटातील हा वाद धुमसत होता. त्याला मंगळवारी तत्कालीन कारण मिळाले.समाधान पाटील याचा मृतदेह तालुका रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!