Thursday, June 20, 2024
Homeक्राइमधक्कादायक! बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या संशयाने २६ वर्षीय तरुणाचे बोलेरो खाली डोकं...

धक्कादायक! बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या संशयाने २६ वर्षीय तरुणाचे बोलेरो खाली डोकं चिरडलं

मृत तरुणाचे पुढच्या आठवड्यात होते लग्न, लग्नाच्या तयारीसाठी वडिलांसह बँकेत गेला होता पैसे काढायला

छत्रपती संभाजी नगर – एक धक्कादायक व मनाला सुन्न करणारी घटना घडली असून पुढच्या आठवड्यात लग्न असल्याने दुचाकीवर वडिलांसोबत बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असलेल्या युवकाच्या गाडीला धडक देऊन त्याच्या अंगावर तीन-चार वेळा जीप घालत भर रस्त्यात त्याचा खून करण्यात आला. हा प्रकार शेंदूरवादा-सावखेडा (ता. गंगापूर) रस्त्यावर गुरुवारी (२८ मार्च) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. पवन शिवराम मोरे (वय २६, रा. जुने ओझर, ता. गंगापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.बहिणीच्या प्रेमविवाहाला मदतीचा संशय असल्याने निर्घृण प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवराम एकनाथ मोढे (वय ४३)व्यवसाय शेती व ऊसतोड मुकादम राहणार ओझर तालुका गंगापूर यांनी दिलेल्या फिर्याद नुसार , शिवराम मोढे यांच्या भाच्याने आरोपी सचिन भागचंद वाकचौरे रा. धुपखेडा, ता. पैठण, जि .छत्रपती संभाजीनगर यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शिवराम मोरे हे त्याचे मुलासह मोटारसायकल क्रमांक एम एच २० जी यु ४९४४ वरून स्वतःच्या गावी ओझरला जात असताना आरोपीं सचीन वाघचौरे याने बोलेरो जीप क्रमांक एम एच २० ई वाय ०६४५ यागाडीने त्याचा पाठलाग करून शेंदूरवादा ते सावखेडा रोडवर राष्ट्रमाता शाळेजवळ २८ मार्च रोजी दुपारी बारा ते पाऊण वाजेदरम्यान त्यांच्या मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे शिवराम मोढे व त्याचा मुलगा पवन शिवराम मोढे वय (२६) वर्ष उंच उडून रोडवर पडले आरोपींनी पुढे जाऊन जीप गाडी वळवून आणली व पुन्हा फिर्यादी शिवराम मोढे यांच्या अंगावर घालून त्यास चिरडण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला केला तसेच रोडवर पडलेल्या फिर्यादीचा मुलगा पवनच्या डोक्यावरून चाक नेऊन त्यास गाडीखाली चिरडून जागीच ठार केल्याप्रकरणी शिवराम मोढे यांच्या फिर्यादीवरून सचिन भागचंद वाकचौरे राहणार धुपखेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर व ईतर पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाळुजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने हे करत आहे.

प्रेमप्रकरणातून खून? – मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या मुलीच्या प्रेमविवाहासाठी मृत पवन याने मदत केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली. मयत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून संशयित ही हत्या केल्याचे बोलले जात असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुढच्या आठवड्यात होते लग्न – मयत पवन शिवराम लोढे या मृत तरुणाचे पुढच्या आठवड्यात लग्न होते. लग्नाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या घरात तयारीसह चैतन्याचे वातावरण होते. एकीकडे परिवार लग्नाच्या तयारीत मग्न असताना पवनच्या मृत्यूच्या बातमी लोढे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!