Friday, September 13, 2024
Homeक्राइमधक्कादायक......प्राध्यापिकेचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थ्यांनेच केली पाच हजार...

धक्कादायक……प्राध्यापिकेचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थ्यांनेच केली पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी

पुणे- पुण्यातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर प्राध्यापिकेने पोलिसांत धाव घेतली आणि या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police News) मयांक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार – Patna, Bihar) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Threatening to make a pornographic video of the professor and make it viral, the students themselves demanded five thousand US dollars

मी सांगतो तसे तुम्ही जर केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. हा प्रकार मार्च २०२० पासून आतापर्यंत सुरु होता. (Pune Crime News) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना “तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला. Threatening to make a pornographic video of the professor and make it viral, the students themselves demanded five thousand US dollars

या विद्यार्थ्यांने हा व्हिडीओ कॉल इंस्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या आयडीवरुन अनेक ऑडिओ व व्हीडिओ कॉल केले. त्यानंतर वेगळ्या आयडीवरुन त्याने प्राध्यापिकेला आणि त्यांच्या पतीला न्यूड व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडून पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. त्यानंतर त्यांनी न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयांक सिंग याला बेड्या ठोकल्या असून सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंधाले हे करत आहे.
Threatening to make a pornographic video of the professor and make it viral, the students themselves demanded five thousand US dollars

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!