Tuesday, September 10, 2024
Homeइतरधक्कादायक पुण्यात हडपसर येथे शंभर रुपयांसाठी खून...

धक्कादायक पुण्यात हडपसर येथे शंभर रुपयांसाठी खून…

पुण्यातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून दारू पिण्यासाठी बसल्यानंतर शंभर रुपयांवरून वादावादी झाल्याने तरुणाने हॉटेल आचाऱ्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर चौकशीतून ही बाब समोर आली आहे. ही घटना हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत ११ मे रोजी घडली होती.(Crime News)

राजेंद्र रामभाऊ शेजुळ (वय ३५, रा. कडनगर, चौक, उंड्री मूळ रा. बुलढाणा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश सिताराम सोनकर (वय २५, रा. माऊलीनगर, कात्रज, मूळ रा. मथुरा विलासपुर, जि. बलमरापुर, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याबाबत राजेंद्र यांची पत्नी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (वय २९) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली होती.(CRIME NEWS)

राजेंद्र शेजुळ एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. परंतु, एकेदिवशी घराबाहेर पडल्यानंतर ते परतले नव्हते. यावेळी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. तपासात त्यांच्या डोक्यात मारहाण करून खून केल्याचे समोर आले होते. यानूसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. राजेंद्र यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी मोकळ्या जागी अनेकजन दारु पिण्यास बसत असत. यावरून आरोपीचा शोध सुरू केला.

तेव्हा हांडेवाडी-सय्यदनगर रोडवर ओपीचे काम करणाऱ्या राजेश सोनकरचे राजेंद्र याच्यासोबत दारु पिण्यावरुन वाद झाल्याची माहिती मिळाली. पथकाने कात्रज परीसरात शोध घेऊन त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता ११ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास राजेंद्र याच्यासोबत दारु पित असताना त्याच्याकडे १०० रुपये मागितले. त्यावेळी राजेंद्रने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली होती. याचा राग मनात धरुन राजेंद्रला लाकडी बांबुने डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सोनकर याने सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!