Friday, June 21, 2024
Homeक्राइमधक्कादायक..पुण्यात पैशांचा पाऊस पडतो म्हणून भोंदू बाबाने तरुणाचे पळवले १८ लाख रुपये,बनावट...

धक्कादायक..पुण्यात पैशांचा पाऊस पडतो म्हणून भोंदू बाबाने तरुणाचे पळवले १८ लाख रुपये,बनावट पोलिसांचाही समावेश

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी रोख १८ लाख रुपये आणण्यात आल्यावर पूजा सुरू असताना बनावट पोलिसांच्या छाप्याचा बनवा करत रकमेसह भोंदूबाबा व साथीदारांनी काढला पळ 

पुणे – हडपसर.  पुरोगामी. व आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) जादूटोण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशाचां पाऊस पाडतो म्हणून एका भोंदू बाबाने तरुणाचे १८ लाख रुपये पळवल्याचे समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बनावट पोलिसांचा देखील समावेश होता. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्याच्या हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशांचा पाऊस पडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पडतो असे सांगत एका तरुणाचे १८ लाख रुपये पळवणारा बाबा आइरा शाब रा.बदलापूर याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांवर पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी (वय ४३) यांना त्यांच्या मित्रामार्फत पैशाचे पाऊस पडतो असे सांगून बाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली होती. या पूजेसाठी १८ लाख रुपये रोख तिथे आणण्यात आले होते. मात्र तिथे आधीच आरोपींनी विनोद छोटेलाल परदेशी यांना फसवण्याचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे आरोपींनी रोख रकमेसह पूजा सुरु केली. मात्र पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही बनावट पोलीस आले. त्यांनी बाबासह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले १८ लाख रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर विनोद परदेशी यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

  संबंधित प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!