Thursday, July 25, 2024
Homeक्राइमधक्कादायक..   फटाका गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू तर आठ...

धक्कादायक..   फटाका गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी

वाढदिवसाच्या स्पार्क कँडल व फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याने आगीत होरपळून ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर  या आगीत सात महिला तर एक पुरुष जण जखमी झाले आहेत 

पुणे -पिंपरी चिंचवड मधील तळवडे परिसरात असणाऱ्या एका स्पार्क कँडल व फटाका बनविणाऱ्या कारखान्यात आग लागल्याने आगीत होरपळून ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ८ जण गंभीर जखमी आहेत. हि आग आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागली.

सहा जणांचा होरपळून मृत्यू – पिंपरी चिंचवड मधील तळवडे परिसरात असणाऱ्या एका स्पार्क कँडल बनविणाऱ्या कारखान्यात आग लागली. आगीत होरपळून ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.  या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खास झाल्या आहेत. 

जखमीमध्ये सात महिला आणि एक पुरुष जखमी – या आगीत मृत्यू झालेल्या सहा जणांची ओळख  पटविण्याचे काम सुरु असून मात्र या दुर्घटनेत यात ८ जण गंभीर जखमी झाले असून  जखमींमध्ये ७ महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या सगळ्या जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारखान्यात जवळपास २० ते २५  कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र सहा जण याच आगीतून स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा होरपळून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाचे आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण – गोदामाला लागलेल्या या आगीवर   काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरू आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली माहिती – या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे.  काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!