Friday, July 12, 2024
Homeक्राइमधक्कादायक... केस कापण्यासाठी बसलेल्या तरुणावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

धक्कादायक… केस कापण्यासाठी बसलेल्या तरुणावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

पूर्ववैमस्यातून हल्ला….अमन शेख हा तरुण जीव वाचवण्यासाठी खाली बसला तरी हल्लेखोर कोयत्याने करीतच होते हल्ला

नाशिक -येथील देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळ्यामागे असलेल्या एका सलूनमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. किस्मत हेअर सलून येथे अमन शेख हा तरुण हा कटिंगसाठी बसला असताना तीन संशयितांनी युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आणि आरोपी फरार झाले असून सदर हल्ल्याचा ठरतं सी सी टी ची कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण पसरले आहे.(Crime News)

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, अमन सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसला आहे. कटिंगला बसलेल्या या युवकावर टोळक्याने दुकानात घुसून काही कळायच्या आधीच कोयत्याने हल्ला चढवला.तीन-चार जण युवकावर जोरदार हल्ला करत असताना जीव वाचवण्यासाठी तो खाली बसला. तरीही हल्लोखोरांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ले सुरु ठेवले. युवकाच्या डोक्यावर आणि हाताच्या पंजावर गंभीर मार लागले आहे. (Crime News)

जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते. जखमी अमन शेख या युवकाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.युवकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांना पोलिसांनी आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी.(Crime News)

हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सी. सी. टीव्हीमध्ये कैद झाला असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.नाशिकमधील वाढती गु्न्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना धाक राहिला की नाही अशी स्थिती आहे. (Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!