दीड वर्षीय मुलगी आईच्या मृतदेहाशेजारी रडत रडत रक्ताने होती माखलेली
दुसऱ्या गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीने पहिल्या पत्नीचा खून करून पंधरा वर्षांची भोगली होती शिक्षा
सोलापूर : पतीने आठ महिन्यांच्यागर्भवती पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता बार्शी तालुक्यातील जामगाव येथे उघडकीस आला. हा प्रकार शुक्रवारी दिनांक १ सप्टेंबर मध्यरात्री घडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत पत्नी गंगा ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. गंगा धनाजी गायकवाड (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर धनाजी गायकवाड (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव आहे हत्या करून आत्महत्या केल्याने संपूर्ण बार्शी तालुका हादरला आहे.(Crime News)
गंगा गायकवाड (वय, ३५) आणि धनाजी गायकवाड (वय, ४५) अशी मृत दाम्पत्यांची नावे आहेत. मृत दाम्पत्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. धनाजी हा जामगाव येथे चायनीज फूड विक्रीचा व्यवसाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान,
शुक्रवारी रात्री दहा वाजता धनाजी हा चायनीज गाडीवरून घरी आला. रात्री अज्ञात कारणावरून पती पत्नीत वादविवाद झाला. धनाजी याने घराला आतून कडी लावून घेत आपल्या दीड वर्षाच्या चिमुरडीसमोर पत्नीला वरवंट्याने डोक्यात मारून जखमी करून हत्या केली. या घटनेत चाकूने देखील मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे. गंगाच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला चाकू सापडला आहे. दीड वर्षीय मुलगी आईच्या मृतदेहाशेजारी रडत होती. रडत रडत दीड वर्षीय मुलगी रक्ताने माखली होती.
यानंतर धनाजीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांना वेगळाच संशय आला. त्यांनी ताबडतोब बार्शी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. घर आतमधून बंद असल्याने पोलिसांनी पत्रा कापून घरात प्रवेश केला. घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलिसांना आणि ग्रामस्थांना जबर धक्का बसला. गंगा ही मृत अवस्थेत जमीनीवर पडली होती. तर, धनाजी हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच त्यांची दीड वर्षांची मुलगी आईच्या मृतदेहाजवळ रडत बसली होती.(Crime न्यूज)
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, उपनिरीक्षक जनार्दन सिरसट, राजेंद्र मंगरूळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, धनाजी केकान, अभय उंदरे धनाजी फत्तेपुरे, सरपंच बाळासाहेब जगताप, बालाजी कागदे उपस्थित होते.