Thursday, July 25, 2024
Homeक्राइमदोन वर्षापासून खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

दोन वर्षापासून खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुणे – भिगवण पोलिसांना हवा असलेल्या खून प्रकरणातील आरोपी दोन वर्षांपासून फरार होता.अखेर भिगवन पोलिसांनी सापळा लावत दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. (Pune – The accused in the murder case wanted by the Bhigwan police was absconding for two years. Finally, the Bhigwan police laid a trap and chained the accused who was on the prowl for two years.)

भिगवन पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २९जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक सिदपाटील, सहाय्यक फौजदार कोकरे, कारंडे पोलीस हवालदार. अजय घुले , स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे असे पनदरे बस स्टँड, बारामती शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भिगवण पोलीस स्टेशन खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी कवन उर्फ स्वरूप दादासो भोसले हा पंदारे बस स्टँड येथे येणार आहे. (Pune Crime News )

या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पनदरे बस स्टँड, बारामती येथे सापळा रचून आरोपी कवन ऊर्फ स्वरूप भोसले ताब्यात घेण्यात आले. (Pune Crime News )

अधिक चौकशी करता सदर आरोपी खुनाच्या व इतर गुन्ह्यांमध्ये २ वर्षापासून फरार असून त्यास भिवगण पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.(Pune Crime News )

सदर प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, एस.डी.पी.ओ बारामतीगणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक सिदपाटील, सहाय्यक फौज कोकरे, कारंडे, पोलीस हवालदार अजय घुले, पो. हवा स्वप्निल अहिवले, अभिजीत एकशिंगे यांनी केली आहे.(Pune Crime News )

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!