Monday, November 4, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?दुर्दैवी …वडिलांनी मुलीला स्वतःची किडनी देऊन ६० लाख रुपये खर्च केला तरीही...

दुर्दैवी …वडिलांनी मुलीला स्वतःची किडनी देऊन ६० लाख रुपये खर्च केला तरीही मृत्यूने मुलीला गाठले

वडिलांनी स्वतःची किडनी मुलीला दिली आणि तिला जगवण्याचा प्रयत्न केला. किडनी बसावल्यानंतर तिने उपचारांना प्रतिसाद दिला.सहा महिन्यानंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागला.वडिलांच्या आटोकाट प्रयत्नानंतरही मुलीचा मृत्यू…….

पुणे – वडील आणि मुलीचे नाते जिव्हाळ्याचे व हृदयस्पर्शी असते.नियती कुणाशी कसा खेळ खेळेल याची काही शाश्वती देता येत नाही. नियतीचा असाच एक दुर्दैवी खेळ वडील आणि मुलीच्या नात्यात घडल्याने काळीज पिळवटून टाकणारी भावना व्यक्त करण्यात येत असून आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात घडल्याने हळहळ व दुःख व्यक्त करण्यात येत आहे.वडिलांनी स्वतःची किडनी मुलीला दिली आणि तिला जगवण्याचा प्रयत्न केला. किडनी बसावल्यानंतर तिने उपचारांना प्रतिसाद दिला.सहा महिन्यानंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागला.वडिलांच्या आटोकाट प्रयत्नानंतरही मुलीचा मृत्यू.( The relationship between father and daughter is intimate and touching. There is no guarantee as to how destiny will play with someone. A heart-wrenching feeling is being expressed as such an unfortunate game of fate happened in the relationship between a father and a daughter and grief and sorrow is being expressed as it happened in Manchar area of ​​Ambegaon taluka. The father gave his own kidney to the daughter and tried to keep her alive. After kidney transplant, she responded to treatment. Six months later, she started suffering again. Despite her father’s desperate efforts, the girl died.)


दोन वर्षापूर्वी मुलीची किडनी खराब होण्याच्या मार्गावर होती. म्हणून वडिलांनी मुलीला पिंपरी चिंचवड येथील जुपिटर रुग्णालयात दाखल केले. आठ महिने डायलेसिस केल्यानंतर मुलीच्या यातना बापाला पाहवल्या नाहीत म्हणून बापाने स्वतःची किडनी आपल्याला मुलीला दिली. ती किडनी तिला बसावल्यानंतर तिने सहा महिने चांगला प्रतिसाद दिला. मात्र कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराचे तिला इन्फेक्शन झाले आणि तिने अवघ्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. क्षणात कुटुंबातून ती निघून गेल्याने वडिलांना मोठा हादरा बसला. या दुर्दैवी घटनेमुळे आंबेगावसह मंचरबपरिसरावर शोककळा पसरली आहे.(Unfortunately…father spent Rs 60 lakh by donating his own kidney to the girl but death overtook the girl)

किडन्या निकामी झाल्याने तिला जगण्यासाठी बापाने प्रयत्नाची पराकाष्टा केली. स्वतःची किडनी तिच्या जगण्यासाठी दिली. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी ६० लाख रुपये खर्च केले. परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिला मृत्यूने गाठले.

   खडकी पिंपळगाव मूळचे असणारे भरत बांगर यांचे कुटुंब सध्या मंचर येथे राहायला आहे. स्नेहा बांगर हिचे शिक्षण एम. एसस्सी. (बायोटेक) झाले. ती मुंबई येथे एका कंपनीत कामालादेखील होती. मात्र, अचानक ती आजारी पडली. रक्तदाब वाढू लागल्याने तिची तपासणी केली. त्या वेळी स्नेहा हिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी तिला पिंपरी-चिंचवड येथील एका रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. काही दिवसांनी तिचे डायलिसिस सुरू झाले. मात्र, शरीर साथ देत नसल्याने तिच्या किडन्या निकामी होऊ लागल्या होत्या. मात्र, लेकीच्या या यातना बापाला बघवल्या नाहीत. बापाने स्वतःची किडनी मुलीला दिली आणि तिला जगवण्याचा मार्ग मोकळा करून दिला.(Unfortunately...father spent Rs 60 lakh by donating his own kidney to the girl but death overtook the girl)

दरम्यान, वडिलांची किडनी बसविल्यानंतर तिने प्रतिसाद दिला. तिला कुठलेही इन्फेक्शन होऊ नये यासाठी तिला आरामासाठी मोशी येथे नातेवाइकांकडे ठेवले. मात्र, सहा महिन्यांनंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिला म्युकरमकोसीस आजाराचे इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला तिच्या शरीरातील एक-एक भाग निकामी झाल्याने काढावा लागत होता. मात्र, या ऑपरेशनमुळे तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. अखेर तिच्या शरीराने तिची साथ सोडली आणि तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या या आजाराची तिला कल्पना आली असावी. त्यामुळे तिने लग्न न करण्याचादेखील निर्णय घेतला होता. बापाने तिच्या उपचारासाठी ६० लाख रुपये खर्च तर केलाच पण तिला जगवण्यासाठी स्वतः ची. किडनीदेखील काढून दिली. मात्र नियतीला तिचं जगणं मान्य नसावं, असंच यातून म्हणावे लागेल.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!