Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्यादिव्यांग बांधवांनी आमदार बच्चु कडू यांची लाडूने केली तुला

दिव्यांग बांधवांनी आमदार बच्चु कडू यांची लाडूने केली तुला

प्रहार संघटना पुणे जिल्हा यांच्यावतीने आमदार बच्चु कडू यांच्या स्वतंत्र अपंग मंत्रालय लढ्याच्या यशाबद्दल तुला करण्यात आली

पुणे – दिनांक २९ नोव्हेंबर
माजी मंत्री व आमदार बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या अथक व सातत्याच्या प्रयत्नांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरु करायला राज्यसरकारला भाग पाडल्याबदद्दल व २० वर्षापासुन दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय व्हावे , यासाठी यशस्वी लढा देणारे आमदार बच्चु कडू यांची पुणे जिल्ह्याच्या वतीने भव्य लाडू तूला व फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी आमदार बच्चु कडू व प्रहार संघटनेच्या नावाने दिव्यांग बांधवांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला
आमदार बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू यांनी दिव्यांगांच्या आयुष्यामध्ये चांगले व सुखाचे दिवस येण्यासाठी जे कष्ट केले यासाठी जो लढा दिला तो असामान्य व अविस्मरणीय, अतुलनीय आहे. याची जाणीव ठेवत आमदार कडू यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत दिव्यांग बांधवांनी लाडू तुला करत फुलांची उधळण करत आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.
स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल व दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आमदार बच्चु कडू यांची लाडूने तुला करणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे असल्याची भावना दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी पश्चिम महारष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, महिलाध्यक्ष सुरेखा ढवळे, पुणे जिल्हा महिलाध्यक्ष अनिता कदम, जिल्हाध्यक्ष शरद जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, हवेली तालुका अध्यक्ष उपजिल्हा महिलाध्यक्ष उज्वला गाडेकर शिरूर तालुका महिलाध्यक्ष ज्योति हिवरे, शिरुर शहराध्यक्ष गणेश कचरे, शिरूर शहर महीलाध्यक्ष नयना परदेसी उपतालुका महिलाध्यक्ष वंदना शिरतोडे , रेश्मा कडलक, प्रहार ज्येष्ठ कार्यकर्ते कुंडलीक वायकुळे, गेणभाऊ जाधव, दशरथ विकास कारकुड, बाळासाहेब काळभोर,सुरेश पाटील व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!