Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यादिलीप वळसेंना जुन्नर,खेडचा आमदार तर अजित पवारांना इंदापूर ,पुरंदरचा आमदार निवडून आणता...

दिलीप वळसेंना जुन्नर,खेडचा आमदार तर अजित पवारांना इंदापूर ,पुरंदरचा आमदार निवडून आणता आला नाही – माजी आमदार जगन्नाथ शेवाळे

आम्ही शरद पवार साहेबांसोबत आहोत. लोकांनी खूप काही दिलं आहे – आमदार अशोक पवार

स्वाभिमान कुठे लाचार झाला ते कळलं नाही, जी मंडळी वाघासारख जगत होती ती शेपूट आत घालतात हे पाहून वाईट वाटतं

तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) दिलीप वळसे पाटीलांना जुन्नर,खेडचा आमदार निवडून आणता आले नाही,अजित पवारांना इंदापूर ,पुरंदरचा आमदार निवडून आणता आला नाही आणि म्हणता पवार साहेबांना मुख्यमंत्री होता आले नाही. कमी पडणार तुम्ही दुबळे पडणार तुम्ही , म्हणणार पवारांचं वय झालं त्यांच्या वयावर जाऊ नका ,त्यांची चेतना ,प्रेरणा, विचार महत्वाचा असून तो कोणालाही म्हातारा होऊ देणार नाही असे विचार व्यक्त करत आमदार अशोक पवार हे एकनिष्ठ राहिले त्यामुळे आमदार पवार यांची आज कॉलर टाइट असून निष्ठावान आमदार आमच्या सोबत आहेत गेले ते कावळे आहेत राहिले ते मावळे आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.यावेळी तरुणाईसह,ज्येष्ठ सहकारी व महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.यापुढे बोलतानाही आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी “स्वाभिमान कुठे लाचार झाला ते कळलं नाही, जी मंडळी वाघासारख जगत होती ती शेपूट आत घालतात हे पाहून वाईट वाटतं. कुठे नेऊन ठेवलाय स्वाभिमानी पक्षाचा स्वाभिमान असा घणाघात करत भाजपा हा पक्ष कंबरेच सोडून डोक्याला गुंडाळण्याच्या स्थितीतमध्ये आलेला आहे त्याला कशाचाही विधिनिषेध नाही असा शब्दप्रहार करत, आचारा विचारांचा तुटवडा जाणवत असून , स्वाभिमान जागवण्यासाठी पवार यांचा पुरोगामी विचार व पुरोगामित्व टिकविण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. अजित पवार गटात गेलेल्या एका आमदाराशी चर्चा सुरू असून फायनल बैठक झाली की आमदार परतण्याची शक्यता असून शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तरुण,ज्येष्ठ वर्ग एकवटत असून सर्व ठिकाणी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एकमेव आमदार अशोक पवार हेच शरद पवार यांच्या बरोबर एकनिष्ठ राहिले असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी केले.

यावेळी आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत कामाचा वेगळा वाटा , त्यांचा एक साधा फोनही खूप मोठे काम करून जातो.संकटाच्या काळात काही झेलायची वेळ आली तर आपण झेलू भाजपा सरकार मध्ये एखादा शेतकरी तमाटयाने पैशावाला झाला , कांद्याला भाव मिळाला तर बोलता पण चार वर्षे त्याचे हाल पाहिले का? एक्सपोर्ट ड्युटी ४० टक्कयांनी वाढवली. भाजपा मुळे शेतकरी,कामगारांचे नुकसान झाले असे म्हणत भाजपाच्या शेतकरी विरोधातील धोरणावर आमदार पवार यांनी टीका करत शेतकरी,कामगारांमध्ये वेगळे वातावरण पाहायला मिळत आहे.सल्लागार २०१९ सल्ला देत होते काय राहील राष्ट्रवादीत तुमच्यासारखा माणूस भाजपात हवा ते आज तत्वज्ञानाचे धडे शिकवत आहेत.शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहे.जिल्ह्यात राज्यात तरुणाई शरद पवार यांच्यामागे युवकांची संख्या मोठी उभी आहे.उद्या आमदार निवडताना तुमचा अधिकार असणार आहे. कोणालाही तिकीट द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमचा जन्म आमदारकीसाठी नाही.लोकांनी खूप काही दिलं आहे असे म्हणत आमदार अशोक पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी नामदेव गिरमकर, समता परिषेदेचे सोमनाथ भुजबळ, नितीन वडघुले, महिला अध्यक्षा संगिता शेवाळे, लतिका वराळे, महेश ढेरंगे, शिवाजी शेलार, संतोष दरेकर, राजेंद्र दरेकर, शिरीष लोळगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, कात्रज दुध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पंडित दरेकर, माजी उपसभापती अनिल भुजबळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा, कारखान्याचे माजी संचालक दिलीप मोकाशी, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले,शिरूर तालुक्याच्या महिला अध्यक्षा विद्या भुजबळ, माजी सभापती आरती भुजबळ, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, उद्योजक राहुल करपे, माजी उपसरपंच राजेश जाधव, सुहास दरेकर, अनिल गोटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला भगिनी,ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रावाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!