Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्यादरेकरवाडी-धानोरे सोसायटीच्या चेअरमनपदी तिरसिंग जवळकर यांची बिनविरोध निवड

दरेकरवाडी-धानोरे सोसायटीच्या चेअरमनपदी तिरसिंग जवळकर यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भीमा येथील पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित चेअरमन तिरसिंग जवळकर यांचा सत्कार

कोरेगाव भीमा – दरेकरवाडी धानोरे ( ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमनपदी तिरसिंग सुभाषराव जवळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

    आशुतोष ढमढेरे यांनी राजीनामा दिल्याने चेअरमनपदाची जागा रिक्त झाली होती. निवडणूक अधिकारी अवधूत धायगुडे यांनी काम पाहिले.

      तिरसिंग जवळकर यांची बिनविरोध निवड झाल्याने कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच प्रकाश ढेरंगे,  हनुमान पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय गव्हाणे, हिंदवी डेव्हलपर्सचे नामदेव ढेरंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश गव्हाणे, पत्रकार सुनील भांडवलकर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!