मेजर विठ्ठल शामराव नाणेकर व मेजर अशोक सुखदेव गोरडे सैन्यदलातुन निवृत्त झाल्यामुळे गावात स्वागत व कृतज्ञता सोहळा
मोराची चिंचोली – दिनांक २६ मार्च
मोराची चिंचोली ( ता.शिरूर) येथे त्रिदल आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची गाव शाखा-चिंचोली मोराची-शास्ताबाद नावाने स्थापना करण्यात येणार असून शाखा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होणार आहे. चिंचोली गावातील भूमिपुत्र मेजर विठ्ठल शामराव नाणेकर व मेजर अशोक सुखदेव गोरडे हे नुकतेच सैन्यदलातुल प्रमाणिकपणे देश सेवेतून निवृत्त झाले त्यानिमित्ताने गावच्या वतीने भव्यदिव्य स्वागत व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभ व मिरवणूकीचा सोहळा आयोजित केलेला आहे. आजी माजी सैनिक व त्यांचा परीवार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या देशभक्ती बाबत व निष्ठेविशयी आदर,प्रेम व्यक्त करण्याबरोबरच देशभक्त सैनिकांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती त्रिदल आजी माजी सैनिक संघटना, पुणे जिल्हा अध्यक्ष शामराव धुमाळ,अध्यक्ष आणि सर्व आजी माजी सैनिक चिंचोली मोराची राजेश नाणेकर यांनी दिली.