Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?तेच शिक्षक, तोच वर्ग, तोच फळा... २५ वर्षांनी भरला मित्रमेळा

तेच शिक्षक, तोच वर्ग, तोच फळा… २५ वर्षांनी भरला मित्रमेळा

डिंग्रजवाडी येथे भरला सव्वीस वर्षांनी जिल्हा परिषदेचा वर्ग

कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथे सन १९९७ – १९९८ या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वर्ग भरला यावेळी उपस्थित शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकांनी जीवनाला आकार देत आकाशात झेप घेण्यासाठी पंखात बळ,मनात आत्मविश्वास तर विचारांना कृतिशिलता आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत माणुसकीचे व मानवतेचे भान बाळगण्याचे बाळकडू दिले याबद्दल गुरुजींच्या पायावर डोके ठेवत कृतज्ञता व्यक्त करत शाळेचे सदैव ऋणी आहोत अशी भावना व्यक्त करत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.

डिंग्रजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील सन १९९७ – १९९८ या वर्षातील सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींना आकर्षक फेटा बांधण्यात येऊन स्मृतिचिन्ह देण्यात आले.या एकी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुरुजन व शाळा यांचे आभार मानत आपल्या जीवनातली यशस्वी वाटचाल सुरू असण्यामागे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी उपस्थित सर्वांना शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी गुरुवर्य छबन प्रभाकर कुताळ गुरूजी यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कर्तृत्वाचे कौतुक करत या गुणी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केल्याचा अभिमान व गर्व वाटत असल्याचे मत व्यक्त केले.या एकी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत शाळेतील स्मृतींना उजाळा दिला.कोणी भावूक झाले तर कोणी आपल्या आयुष्यातील संघर्ष मांडत इतरांना प्रेरणा दिली पण सगळ्यांनी शाळा व शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन समारंभ पार पडला.

कार्यक्रमाचे नियोजन संभाजी गव्हाणे, गणेश गव्हाणे, राहुल नाबगे, शरद गव्हाणे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाराणसी मारुती दिवेकर यांनी केले.
यावेळी गणेश नंदाराम गव्हाणे,गणेश जालिंदर गव्हाणे, शरद गोपीनाथ गव्हाणे, शरद विठ्ठल गव्हाणे , संतोष गव्हाणे, विशाल गव्हाणे, राहुल गव्हाणे, छबुलाल गव्हाणे, किरण पिसे, सचिन भंडलकर, संतोष गव्हाणे, बापूसाहेब माकर, सारिका सचिन चौधरी, ज्योती सुभाष दरेकर, सीमा सुभाष कोतवाल,रुपाली कुमार वाघमारे, मंदा शरद येवले, विमल इंगळे,भारती सोमनाथ इंगळे अनुराधा संतोष शिवले, मनिषा शिवले, मोनिका नाबगे, रोहिणी नवनाथ घेनंद, रोहिणी अशोक उमाप, रूपाली ( कांता ) संदिप इंगवले,निशा ( मनिषा ) विजय पाचुंदकर उपस्थित होतें.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!