Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यातेच शिक्षक तेच विद्यार्थी व विद्यार्थिनी असा डिंग्रजवाडी येथे भरला २७ वर्षांनी...

तेच शिक्षक तेच विद्यार्थी व विद्यार्थिनी असा डिंग्रजवाडी येथे भरला २७ वर्षांनी वर्ग

कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील सं १००९५-९६ ची इयत्ता सातवीचा वर्ग पुन्हा एकदा भरला होता.यावेळी तत्कालीन असणारे शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पुन्हा एकदा पुन्हा तोच सुखद अनुभव पुन्हा केदा नव्याने मिळवला.

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात पार पडला१९९५-९६ मध्ये शिकवण्यासाठी असणारे शिक्षक मायने मॅडम, माने गुरुजी, कुताळ गुरुजी, मुलानी गुरुजी उपस्थित होते.वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थि व विद्यार्थिनी यांनी करियर घडवले व नावलौकिक मिळवल्याने शिक्षकांनी समाधान व आनंद व्यक्त केला.तसेच येथील शाळा,गावपण,माती आणि सामाजिक देणं कधी विसरू नका असे मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थी व माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे,उद्योजक पोपट गव्हाणे,विकास गव्हाणे,मनोज नाबगे, रामदास गव्हाणे,,बापू गव्हाणे,संपत नाबगे, भीमराव गव्हाणे, संतोष गव्हाणे व माजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट गव्हाणे यांनी तर कार्यक्रमाचे अभर कावेरी गव्हाणे – ढमढेरे यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!