न्हावरा : प्रतिनिधी
न्हावरा : (ता.शिरूर) पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकरी यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. या योजनेत पुढील लाभ मिळण्याकरता केंद्र शासनाने इ-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने शिरूर तालुक्यामध्ये इ-केवायसी चे काम हे मोहिम स्वरूपात करण्यात येत आहे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी न्हावरे येथील विविध सीएससी केंद्रावर भेटी देऊन पी एम किसान इ-केवायसी कामांची पाहणी करून सीएससी चालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वांनी आपल्या गावातील लाभार्थी यांना इ-केवायसी करण्यासाठी कळवावे या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा आपल्या तालुक्यातील कोणताही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे असे कृषी अधिकारी सिध्देश ढवळे यांनी सांगितले यावेळी मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कृषी सहाय्यक सुनीलकुमार नाईक,सीएससी केंद्र चालक दादा थेऊरकर,महेश दुर्गे, विशाल झेंडे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
या कामात गावातील सरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावचे १००% इ-केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे व आपल्या गावातील कोणतेही लाभार्थी यापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे अवाहन कृषी अधिकारी यांनी केले.