Friday, June 21, 2024
Homeशिक्षणतालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत कोरेगाव भिमाची श्रद्धा पाटील प्रथम

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत कोरेगाव भिमाची श्रद्धा पाटील प्रथम

कोरेगाव भीमा :कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा हिरालाल पाटील हिचा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरुर शिक्षण विभाग यांच्या वतीने स्वराज्य महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता ३ री ते ५ वी च्या गटात प्रथम क्रमांक आला.

चित्रकला स्पर्धेसाठी श्रद्धाला वर्गशिक्षक सुरेश सातपुते मुख्याध्यापक कुसुम बांदल यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल तिचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, उपाध्यक्ष दमयंती कांचन व सर्व सदस्य, पालक, व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. तसेच पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!