Friday, June 21, 2024
Homeक्राइमतळेगाव- न्हावरे महामार्गावर भीषण अपघात... तीन जणांचा जागीच मृत्यू... जखमींची प्रकृती चिंताजनक....

तळेगाव- न्हावरे महामार्गावर भीषण अपघात… तीन जणांचा जागीच मृत्यू… जखमींची प्रकृती चिंताजनक….

तळेगाव ढमढेरे ( ता शिरूर) येथे तळेगाव न्हावरे महामार्गावर मार्गावर झालेल्या टेम्पो व स्विफ्ट कार गाडीच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाले असून जखमींवर शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सुरू आहेत.

शिक्रापूर तळेगाव- न्हावरा रोडवर रविवारी दिनांक ३ सप्टेंबर रोजी. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला असून NH 548D या महामार्गावर तोडकर वस्ती नजीक झालेल्या अपघातात टेम्पो MH16 CD 4742 व स्विफ्ट कार MH12 SU5659 समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्हीही गाड्यांचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट कार मधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे .अपघाताची तीव्र भीषणता इतकी होती की स्विफ्ट मधील एअर बॅग ओपन झाल्या होत्या तर गाडीच्या काचा फुटल्या असून पुढील भागाचा चक्काचुर झाला आहे .

सदर अपघातात कविता बोरुडे (वय ४०) , योगिता बोरुडे (वय ४१), कारचालक राजू शिंदे (वय २५) वर्ष सर्व राहणार कात्राबाज मांडवगण ,श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर किशोरी बोरुडे टेम्पोचालक श्रीराम बापूराव मांडे, धीरज कांतीलाल लोखंडे, हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांची अनमोल मदत – अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदत केली. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले.

शिक्रापूर पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस पुढील तपास करण्यात येत आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!