Monday, October 14, 2024
Homeइतरतळेगाव ढमढेरे सोसायटीवर भैरवनाथ (मुळोबा) जय मल्हार पॅनलची एकहाती सत्ता

तळेगाव ढमढेरे सोसायटीवर भैरवनाथ (मुळोबा) जय मल्हार पॅनलची एकहाती सत्ता

नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान करतना शिरूर-हवेली आमदार व पॅनल प्रमुख .

संघर्षमय लढतीत बळीराजा सहकार परिवर्तन पॅनलचा १३- ०० नी दारूण पराभव

तळेगाव ढमढेरे दि.३० (वार्ताहर) तळेगाव ढमढेरे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चुरशीच्या लढतीत श्री भैरवनाथ (मुळोबा) जय मल्हार पॅनलने शेतकरी संघटना व समविचारी आघाडी पुरस्कृत असणाऱ्या बळीराजा सहकार परिवर्तन पॅनलचा १३/०० ने पराभव करत तळेगाव ढमढेरे सोसायटीवर एकहाती सत्ता स्थापन केली.विजयी उमेदवारांचे शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ब्रिटीशकालीन स्थापित शतकोत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या तळेगाव ढमढेरे विविध कार्यकारी सह.संस्थेच्या पंचवार्षिक पदाधिकारी निवडणूकीचा कार्यक्रमसंपन्न झाला.पदाधिकारी मंडळाच्या १३ जागेंसाठी २७ उमेदवार रिंगणात उतरले होते.अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत सर्व पक्षीय पुरस्कृत श्री भैरवनाथ(मुळोबा)जय मल्हार पॅनलने राजकीय कौशल्याच्या व संघटनाच्या बळावर एकहाती विजय मिळविला.गावपातळीवरील सर्वोच्च मानली जाणारी सहकार शेत्रातील संस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला शेतीसाठी जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक पवार यांनी केले.यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे,अनिल भुजबळ,विश्वास ढमढेरे,घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढमढेरे ,शिरूर तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा विद्या भुजबळ ,माजी पंचायत समिती माजी सदस्य अरुणराव भुजबळ,पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा,माजी चेअरमन संदीप ढमढेरे,अविनाश ढमढेरे ,सचिन घुमे ,निवृत्ती जकाते,पांडुरंग नरके,सरपंच अंकिता भुजबळ,उपसरपंच नवनाथ ढमढेरे,खरेदी विक्री संचालक शहाजी ढमढेरे ,शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ग्राम पंचायत .सदस्य गोविंद ढमढेरे ,सुदर्शन तोडकर ,उत्तम रासकर सामाजिक कार्यकर्ते विजय ढमढेरे, सुनील ढमढेरे,अमोल गायकवाड ,सुखदेव भुजबळ,अभिजित नरके ,पी.डी.भूमकर योगेश ढमढेरे,उमेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी यशाचे शिलेदार व संघर्षमय लढतीत विजय खेचून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ,माजी उपसरपंच गणेश तोडकर,महेंद्र पिंगळे ,बाळासो लांडे,मोहन भुजबळ ,नितीन ढमढेरे,तुका ढमढेरे,दादाभाऊ शिनलकर,खंडू भुजबळ ,राहुल भुजबळ,किरण शिंदे,काका शेलार,चेतन घुमे,राजेंद्र ढमढेरे,निलेश भुजबळ,गणेश भुजबळ,भरत भुजबळ,महेश ढमढेरे या यंत्रणेचा नामगौरव करण्यात आला..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत ढमढेरे यांनी केले.स्वतंत्र

निवडून आलेले सर्वसाधारण कर्जदार प्रतिनधी –ढमढेरे बाळासो लक्ष्मण ,ढमढेरे रामभाऊ नारायण ढमढेरे विजय किसनराव,ढमढेरे संतोष विजय,भुजबळ पोपट रामदास,भुजबळ विजय लक्ष्मण,भुजबळ शिवाजी धोंडीबा,भुजबळ श्रीपती उत्तम महिला प्रतिनिधी – भुजबळ कमल बबन,भुजबळ पुष्पा अर्जुन इतर मागासवर्गीय प्रतिनधी – भुजबळ ज्ञानोबा रंगनाथ अनुसूचित जाती/जमाती प्रतीनिधी – शेलार दशरथ बबन भटक्या विभुक्त जाती/जमाती प्रतिनिधी – घुमे राजेंद्र काळूराम

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!