Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यातळेगाव ढमढेरे येथे आढळली अतिविषारी घोणस आणि दहा पिले

तळेगाव ढमढेरे येथे आढळली अतिविषारी घोणस आणि दहा पिले


तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील मोहन मळा येथील सुरेश सुदाम ढमढेरे यांच्या घरामध्ये अतिविषारी जातीचा साप आणि त्याची पिल्ले आढळून आली. सर्पमित्र आणि वनविभागाच्या समक्ष घोणस सापा सहित पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले. A highly poisonous snake and ten piglets were found in Talegaon Dhamdhere
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) ( Talegaon Dhamdhere) मोहन मळा येथील सुरेश सुदाम ढमढेरे यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना पहाटे पाचच्या सुमारास देवघरात असलेला एक फोटो पडल्याचा आवाज झाल्याने जागे झाले. उठून पाहिले असता घरात सर्वत्र सापाची छोटी छोटी पिले फिरत असताना दिसली. घाईगडबडीने उठत त्यांनी मुलगा सागर यास आवाज देऊन उठवले आणि झालेली घटना सांगितली. सागर सुरेश ढमढेरे यांनी तळेगाव ढमढेरे येथिल नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे Nature Guard Organization सर्पमित्र गणेश टिळेकर यांना मोबाईलवर संपर्क साधत घरामध्ये अनेक सापाची पिल्ले असल्याचे सांगितले. सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी त्वरित धाव घेत पाहिले असता, ती पिल्ले अतिविषारी घोणस जातीच्या सापाची असल्याचे आढळून आले. घरामध्ये सर्वत्र शोध घेतल्यानंतर दिसुन आले की दहा पिल्लांसोबत त्यांची आई ही त्या घरात आढळून आली. A highly poisonous snake and ten piglets were found in Talegaon Dhamdhere
सर्पमित्र (snake friend) गणेश टिळेकर यांनी सर्व साप पकडल्यानंतर वनविभागाच्या वनपाल गौरी हिंगणे यांना सदर घटनेची माहिती दिली व घोणस सापा सहित पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले.माहिती देताना सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी सांगितले. पावसात बिळांमध्ये पाणी जात असते आणि त्यामुळे सर्व प्रकारचे साप घराजवळ आडोशाला येतात त्यासोबत बऱ्याच सापांचा प्रजनन काळ त्यामुळे त्यांची नवजात पिले ही घरात किंवा घराजवळ आढळतात, आणि सर्पदंशाच्या घटनांमधे वाढ होते. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी घरात किंवा घराजवळ साप आढळून आल्यास त्यांना न मारता जवळच्या सर्पमित्रांना संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले.A highly poisonous snake and ten piglets were found in Talegaon Dhamdhere

नागरिकांनी सापांपासून संरक्षणासाठी अशी काळजी घ्या

👉 आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. परिसरात दगड विटांचा, लाकडाचा ढीग करू नका. उंदराचे विळ, भित, दरवाजे खिडक्यांच्या फटी बुजवून टाका. सापांसाठी हे आपल्या घरचे प्रवेशद्वार आहे. Always keep your surroundings clean. Do not pile stones, bricks, wood in the area. Put out rat holes, walls, cracks in doors and windows. For snakes, this is the entrance to your home.

👉 दरवाजे खिडक्यांना लागून असणाऱ्या झाडाच्या अतिरिक्त्त फांद्या छाटा.

👉 सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर, जमिनीपासून वर ठेवा.

👉 अंधारातून चालताना एक काठी आणि टॉर्च सोबत ठेवावी.

👉 रात्री जमिनीवर न झोपता पलंगावर झोपावे.

👉 चप्पल-बूट घालण्यापूर्वी त्यात साप नसल्याची खात्री करावी.
👉 साप निघाल्यास जवळच्या जाणकार सर्पमित्रास किवा वनविभागाच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!