Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यातळेगाव ढमढेरे येथील भुजबळ विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

तळेगाव ढमढेरे येथील भुजबळ विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.

समाजभूषण संभाजीराव भुजबळ यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शुक्रवार दिनांक 3 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रपट लेखक दिग्दर्शक फु बाई फु फेम . मिलिंद शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी भुजबळ, अध्यक्षा मंगल भुजबळ यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत श्री गणेश वंदना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान व पराक्रमी इतिहासाची महती सांगणारी गीते, लोकगीते, चित्रपट गीते, व हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यतीचे तरुणावरील परिणाम, पर्यावरण रक्षण, यासारख्या सामाजिक विषयावरील नाटकाद्वारे जनजागृती केली. यावेळी गतवर्षीच्या दहावी व बारावी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, विज्ञान प्रकल्प, क्रीडाक्षेत्र,यावर्षीच्या पाचवी ते बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. .

कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतांमध्ये समाजभूषण संभाजीराव भुजबळ यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला व विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. मान्यवरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे संभाजी गवारे , भाजपा पुणे संघटक ॲड धर्मेंद्र खांडरे , भाजप पुणे उपाध्यक्ष भगवान शेळके , भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे कैलास नरके, अध्यक्ष शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे तुकाराम बेनके, शिरूर उपाध्यक्ष रामनाथ इथापे, माजी पं.स.सदस्य तुकाराम बेनके, माजी पं. स. सदस्य तुकाराम बेनके, संभाजी भुजबळ पतसंस्था चेअरमन राजाराम शिंदे , ह. भ. प. दादाभाऊ भुजबळ, रमेश भुजबळ, सुरेश रासकर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश मुंजावडे व आभार किरण झुरंगे यांनी केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!