Friday, July 12, 2024
Homeक्राइमतळेगाव ढमढेरेत सोनार वृद्ध दांपत्यावर खुनी हल्ला …

तळेगाव ढमढेरेत सोनार वृद्ध दांपत्यावर खुनी हल्ला …

सोनार दुकान बंद करताना झाला अचानक हल्ला, दुकानात असणारा ऐवज ,वस्तू,पैसे चोरी गेले नाही.

प्रतिनिधि मयूर भुजबळ

तळेगाव ढमढेरे -दि.२३

तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथील महेंद्र जयंतीलाल शहा या सोनार दुकानात सायंकाळी ७.३० च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने वृद्ध दांपत्यास खुनी हल्ला करून जखमी केले असल्याची घटना घडली आहे.

याबाबत राहुल महेंद्र शहा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि.२३ रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान ज्वेलरी दुकानाचे मालक महेंद्र जयंतीलाल शहा व त्यांची पत्नी सरिता शहा या सायंकाळच्या वेळी दुकान बंद करत असताना दुकानाच्या छोट्या प्रवेशद्वारातून अज्ञात व्यक्तीने आत येऊन आतमध्ये असणाऱ्या शहा दांम्पत्यावर कोणत्यातरी हत्यार सदृश्य वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने सरिता शहा गंभीर जखमी झाल्या .यावेळी दोघांनी आरडाओरडा केला,त्यांच्या आवाजाने शेजारी नागरिक जमा होऊ लागल्याने अज्ञात हल्लेखोर दुकानच्या मागील बाजूस असणाऱ्या कुलूपबंद दरवाजाची किल्ली घेत पसार झाला. विशेष म्हणजे यामध्ये दुकानात असणारा ऐवज ,वस्तू,पैसे चोरी गेले नाही.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर ,पोलीस उपनिरीक्षक नितीन अतकरे ,पोलीस हवालदार किशोर तेलंग ,अमोल चव्हाण ,अंबादास थोरे ,संतोष शिंदे ,रोहिदास पारखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान या घटनेची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली .विशेष या घटनेत सोनाराचे दुकान असूनही कोणत्याही ऐवज,वस्तू,पैसे चोरीला गेले नाही.यावरून पूर्व वैम्यनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!