Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यातळेगाव ढमढेरे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन

तळेगाव ढमढेरे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन

तळेगाव ढमढेरे दि.२५

तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ करण्यात आला.यामध्ये भिमाशेत स्मशानभूमी वॉल कंपाऊंड करणे,भिमाशेत माळीवस्ती बंदिस्त गटारलाईन करणे ,जि.प.शाळा शौचालय,शाळा दुरुस्ती,रंगरंगोटी करणे,शाळा वॉल कंपाऊंड ,फिल्टर पाणी प्लांट बसविणे,भिमाशेत अंगणवाडी दुरुस्ती व रंगरंगोटी,मोहनमळा शहाजीबापू ढमढेरे वस्ती रस्ता खडीकरण करणे,मोहनमळा जिल्हा परिषद शाळा स्पीकर सेट,पिंगळे नगर येथे सार्वजनिक शौचालय व प्रकाश व्यवस्था करणे अशा सुमारे ५० लक्ष रु निधीच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.

यावेळी सरपंच अंकिता भुजबळ,उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ,ग्राम पंचायत सदस्य गोविंद ढमढेरे,राहुल भुजबळ,दिपाली ढमढेरे,ग्राविकास अधिकारी बापूसाहेब गोरे,सामाजिक कार्यकर्ते भरत भुजबळ , किरण शिंदे ,रघुनाथ गायकवाड,प्रभाकर कापरे,किसन कापरे,मारुती ढमढेरे,शिवराम शिंदे,रामभाऊ शिंदे,हनुमंत भुजबळ,शिवाजी भुजबळ ,किसन भुजबळ,मारुती भुजबळ,लक्ष्मण भुजबळ,दत्तात्रय भुजबळ,माउली भुजबळ,युवा उद्योजक अमोल कापरे,अतुल शिंदे,गणेश तोडकर,सुनील भुजबळ,सोमनाथ ढमढेरे,प्रकाश कापरे,समीर ढमढेरे,नवनाथ शिंदे ,मुख्याध्यापक सुवर्णा वाबळे ,अंगणवाडी सेविका कांता ढमढेरे ,सविता भुजबळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया ढमढेरे ,उपाध्यक्षा दिपाली भुजबळ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!