Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यातरुणांनी समाजभान जपत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केली साजरी

तरुणांनी समाजभान जपत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केली साजरी

युट्युबर अन्नदाता सौमित्र जना, भिमशक्ती युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विधायक सामाजिक उपक्रम

कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.हवेली) येथे युट्युबर अन्नदाता सौमित्र जना भिमशक्ती युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबवत समाजभान जपण्यात आले असून तरुणाईच्या या अनोख्या उपक्रमाने समाजसुधारकांची जयंती विधायक उपक्रम साजरा करणायाने एक नवीन सामाजिक आदर्श ठेवण्यात आला आहे.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतर अनावश्यक खर्च टाळून अनाथ व गरजूवंत दिव्यांग  निवासी विद्यालय पेरणे फाटा (ता. हवेली) येथे शालेय साहित्य व अन्नदान करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन युट्युबर अन्नदाता सौमित्र जना,  भिमशक्ती युवा सेना महाराष्ट्र राज्य कोरेगांव भिमा संस्थापक अध्यक्ष विलास  इंगळे,सतीश कांबळे, मंदार खैरमोडे, प्रथमेश शिंद, अतिश कांबळे गणेश शिंदे, संतोष गायकवाड यांनी केले होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!