Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?तरुणांनी आता समाजकारण व राजकारणात पुढे यावे - ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा...

तरुणांनी आता समाजकारण व राजकारणात पुढे यावे – ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे

अण्णा हजारे यांनी जागवल्या स्वर रावसाहेब पवार यांच्या आठवणी , अण्णा हजारे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी  आमदार अशोक पवार यांनी घेतली सदिच्छा भेट

शिरूर – राळेगण सिद्धी (ता. पारनेर) पद्मभूषण आण्णा हजारे यांनी आपल्या देशात सर्वात जास्त युवा शक्ती आहे. त्यांनी आता देशातील समाजकारणात व राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला हवा त्यासाठी जिद्दीने पुढे यायला हवे व देशाचे  उज्वल भविष्य घडवण्यासाठी झोकून देत काम करायला हवे अशी भावना आमदार अशोक पवार यांच्या जवळ व्यक्त केली.

     ज्येष्ठ समाजसेवक व पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी आमदार अशोक पवार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत मार्गदर्शन केले.यावेळी स्वर्गीय माजी आमदार रावसाहेब पवार यांच्या स्मृतींना आण्णा हजारे यांनी उजाळा देत पारनेर तालुक्यावर मनापासून प्रेम करणारे आमचे स्नेही रावसाहेब पवार यांची आठवण येते असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माजी आमदार रावसाहेब पवार यांचे मातृ पितृ छत्र लहानपणीच हरपल्याने पारनेर तालुक्यात आजोबांकडे संगोपन –    अवघ्या दोन वर्षांचे असताना माजी आमदार रावसाहेब पवार यांचे आई वडिलांचे छत्र हरपले.जवळचे सख्खे कोणी नातेवाईक नसल्याने त्यांच्या आईच्या वडिलांनी त्यांना रुई छत्रपती येथील आपल्या घरी नेत संगोपन केले.त्याकाळी अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य असलेल्या आजोबांकडून त्यांना समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू मिळाले.

शिक्षण व आयुष्याची पायाभरणी पारनेर तालुक्यात झाल्याने माजी आमदार रावसाहेब पवार यांना पारनेर तालुक्याविष्यी विशेष भावनिक स्नेहबंध होता.तेथील नागरिकांनाही त्यांच्याविषयी जिव्हाळा मोठ्या प्रमाणावर होता.

  रावसाहेब पवार यांच्या  स्नेहपूर्ण स्वभावाची , माणुसकीची , सहकार, कृषी व राजकीय क्षेत्रातील कामगिरीची आठवण काढत जुन्या आठवणींना उजाळा देत पारनेर तालुक्यावर जीव लावणारे जिव्हाळ्याचे स्नेहबंध जपणारे रावसाहेब पवार यांच्या आठवणींना उजाळा देत आमदार अशोक पवार यांच्याशी आण्णा हजारे यांनी भावनिक संवाद साधला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!