कोरेगाव भिमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील एम एस सी बिच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांचा अडीच एकर जाळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वीज वितरण महामंडळाकडून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास डिंग्रजवाडी येथील नाबगे मळा येथील गट नं.९५ मधील अडीच एकर ऊस जळाल्याने निशांत पर्वतराज नाबगे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विलास गबाजी नाबगे, पांडुरंग शिवराम नाबगे, केरबा गव्हाणे, बरिकभाऊ दादाभाऊ गव्हाणे यांचे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी उसाला लागलेली आग विझवण्यासाठी विझविण्यासाठी बाळू नाबगे, संचालक अशोक नाबगे, चांगदेव नाबगे, प्रज्वल नाबगे, दिपक, दशरथ गव्हाणे, कृष्णा नाबगे,रोहन नितीन गव्हाणे यांनी मोलाची मदत केली.तातडीने महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी पर्वतराज नाबगे यांनी केली आहे.