कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी ( ता.शिरूर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात कृषी भूषण नामदेव माळी यांनी सेंद्रिय शेती व ठिबक सिंचन बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच गोरक्ष घावटे रिसोर्स पर्सन यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने ऊस उत्पादन बाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच प्रकाश गव्हाणे, ग्रामसेवक सदानंद फडतरे, कृषी मित्र भालचंद्र गव्हाणे , खंडू गव्हाणे ,कृषी पर्यवेक्षक सुनील मोरे, किरण गव्हाणे ,दत्तात्रय गव्हाणे ,नारायण गव्हाणे ,सागर ढेरंगे, काशिनाथ ढमढेरे , संतोष गव्हाणे,व इतर शेतकरी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी अशोक जाधव यांनी प्रास्ताविक करून कृषी खात्याच्या योजना व रब्बी हंगाम मोहीम बाबत बाबत मार्गदर्शन केले सूत्रसंचालनप्रशांत दोरगे यांनी केले. कार्यक्रम आयोजनास ग्राम पंचायत डिंग्रजवाडी यांचे सहकार्य लाभले