Friday, June 21, 2024
Homeकृषिडिंग्रजवाडी येथे दिवसाढवळ्या आढळला बिबट्या, एकूण पाच सहा बिबट्या असण्याची शक्यता...

डिंग्रजवाडी येथे दिवसाढवळ्या आढळला बिबट्या, एकूण पाच सहा बिबट्या असण्याची शक्यता…

वन विभागाच्या वतीने डिंग्रजवाडी येथे तातडीने बसवण्यात येणार पिंजरा  – प्रताप जगताप वन परिक्षेत्र अधिकारी, शिरूर

कोरेगाव भिमा – दिनांक १७ डिसेंबर डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथे दुपारी दोनच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसला असून येथे पाच – सहा बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले असून येथील फिरस्त्या कुत्र्यांची शिकार करत आहेत वनविभागाकडून तातडीने पिंजरा बसवण्यात येणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

डिंग्रजवाडी येथे बिबट्याच्या वावर असून त्याबाबत पाहणी करण्यासाठी वनरक्षक बबन दहातोंडे यांना पाठवले असून सदर परिसरात पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असून बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रात मंगळवार दिनांक १९ डिसेंबर पर्यंत तातडीने पिंजरा लावण्यात येईल तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी व काही समस्या आल्यास वनविभागास तातडीने कळवावे . – प्रताप जगताप , वन परिक्षेत्र अधिकारी ,शिरूर

   डिंग्रजवाडी येथे बिबट्याचा बिनधास्त वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण  झाले आहे. शेतकऱ्यांना रानातील कामे करताही येत नसून पाण्याची मोटार चालू अथवा बंद करायला जाता येत नाही.

डिंग्रजवाडी येथे बिबट्याच्या बिनधास्त फिरताना एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात फिरत असून सदर व्हिडिओ वन विभागाला पाठवल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

   जनावरांना चारा आणणे,शेतीला पाणी देणे,फवारणी, व इतर शेतीची कामे बिबट्याच्या भीतीने करता येत नसून शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.महिलांना शेतात काम करण्यासाठी जाता येत नाही. येथील काही शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन शेतातील कामे करण्यासाठी शेतात जावे लागत आहे.

गावातील भटक्या/ फिरत्या कुत्र्यांची संख्या झाली कमी डिंग्रजवाडी हे शेतीवर अवलंबून असलेल गाव असून येथे मोठ्या प्रमाणात जनावरे पाळण्यात येत असून घरगुती पाळतू कुत्र्याबरोबर गावात फिरस्ती/ भटकी कुत्र्यांची मोठी संख्या होती. आठ दहा भटक्या कुत्र्यांचा कळप पाहायला मिळायचा पण बिबट्यांचा वावर वाढला असून गावातील भटकी कुत्री दिसायची बंद झाली असून बिबट्यांनी त्यांचा फडशा पाडला की काय अशी शंका उपस्थित होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!