नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
कोरेगाव भीमा – दिनांक २२ जून
मागील काही दिवसांपासून डिंग्रजवाडीतील सजगणी परिसरात बिबट्याचा वावर होता.याबाबत स्थानिकांनी वन विभागाकडे तक्रार केली होती.याबाबत सरपंच यशवंत गव्हाणे , ग्रामसेवक सदानंद फडतरे व ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पिंजरा लावण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी शिरूर मनोहर म्हसेकर, वन परिमंडळ अधिकारीपि ए क्षीरसागर, वनरक्षक बबन माणिकराव दहातोंडे, शिपाई आनंदा हरगुडे यांनी पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जेरबंद केलेला बिबट्या नर असून त्याला शिरूर येथे रवाना करण्यात आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद गव्हाणे, माजी उपसरपंच संदीप माणिक गव्हाणे, दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे, तुषार गव्हाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.