Wednesday, July 24, 2024
Homeताज्या बातम्याठरल तर मग... शिरूर लोकसभा मतदार संघावर मनसेचा झेंडा फडकावायचा - जिल्हाध्यक्ष...

ठरल तर मग… शिरूर लोकसभा मतदार संघावर मनसेचा झेंडा फडकावायचा – जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर

रांजणगाव (ता.शिरूर) आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकावायचा असून मनसे संस्थापक राज ठाकरे यांचा सर्वांगीण विकासाचा विचार व मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी असणारा प्रेरणादायक कृतीयुक्त विचारांचा लढा सर्वसामान्य व तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासह त्यांना न्याय देण्याचे काम करायला हवे असे प्रतिपादन रांजणगाव येथील मनसे पदाधिकारी मार्गदर्शन व नियुक्ती वेळी पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी केले.

रांजणगाव येथे नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी मार्गदर्शन व नियुक्ती बैठकीवेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अभिप्रेत पक्ष संघटना बांधणीसाठी कटीबद्ध असून, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कल्पक, होतकरू व कार्यक्षम तरूणांना राज ठाकरे यांचे सामाजिक परिवर्तनाचे व नवनिर्माणाचे विचार पटवून देताना त्यांना पक्षाच्या झेंड्याखाली संघटीत करण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करूयात व सर्वसामान्यांच्या मनात आपली व पक्षाची प्रतिमा तयार करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी केले.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर , पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसे शिरूर हवेलीचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. मनसेच्या शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे झालेल्या बैठकीत शिरूर – हवेली तालुकाध्यक्ष तेजस यादव,शिरूर -आंबेगाव तालुकाध्यक्ष नानासाहेब लांडे, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खेडकर, शिरूर शहर सचिव रवीराज लेंडे, सणसवाडी माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष नरके आदी यावेळी उपस्थित होते.

मनसेच्या शिरूर तालुका संघटकपदी अविनाश घोगरे , बाळासाहेब कुंभार शिरूर तालुका उपाध्यक्ष रांजणगाव जि.प. गट,शरद तावरे रांजणगाव शाखाध्यक्ष, साहील काळे (विभाग अध्यक्ष) कारेगाव गण, गणेश पाचुंदकर (विभाग अध्यक्ष) रांजणगाव गण, विशाल पवार,शाखा उपाध्यक्ष रांजणगाव, प्रमोद सुक्रे ,उपाध्यक्ष शिरूर आंबेगाव तालुका,अभिषेक नेवासकर उपाध्यक्ष शिरूर आंबेगाव तालुका,बंडोपंत दुधाने विभाग अध्याख शिरूर शहर, रविराज लेंडे सचिव शिरूर शहर यांची निवड करण्यात येऊन आगामी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याच्या सूचना देण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

👉 हे पण वाचा – सणसवाडी येथील तरुणाची कामगिरी ग्रेट…स्वकमाईने दिली कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!