पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या लढ्याला यश, राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे व लता शिरसाठ यांच्या लढ्याला बळ
कोरेगाव भिमा- पेरणे फाटा (ता.हवेली) येथील जयस्तंभ परिसरात खोदकाम करण्यास मनाई करण्यात आल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कदम यांनी दिले असून पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या लढ्याला यश मिळत असून राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या भेटीचा,रास्ता रोको,शासकीय विभागांना करण्यात आलेला पत्रव्यवहार, उपोषणाचा इशारा व जयस्तंभ, भीमसैनिक यांच्या सुरक्षिततेच्या लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया देत जोपर्यंत संबधित गॅस पाईप लाईन स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याची लता शिरसाठ यांनी माहिती दिली.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा लता शिरसाठ यांनी टोरेंट गॅस पुणे लि. यांची टोरंट गॅस पाईप लाईन स्थलांतरित करण्याच्या मागणीसह कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून संबधित अधिकाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीवर हमीपत्र लिहून देत भविष्यात संबधित पुलाला काही बाधा किंवा धोका निर्माण झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील असे हमीपत्र लेखी मागण्यासह दुर्दैवाने जर पुलाला काही झाल्यास अथवा जीवित हानी झाल्यास संबधित नुकसान झाल्यास संबधित नुकसान केंद्र ,राज्य ,जिल्हा प्रशासन यांच्याकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई , तिचे स्वरूप व इतर मागण्या करण्यात आल्या असून सबंधित बाबतीत बांधकाम विभागाने टोरेंट गॅस पुणे लि. हवेली तालुक्यातील पेरणे फाटा हद्दीत रस्त्याच्या कडेला पुढील आदेश होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्र उपअभियंता राहुल कदम यांनी दिले आहे.
या पत्रात टोरेंट गॅस पुणे लि. यांनी मा.जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडून पुणे-नगर रस्त्यावर भीमा नदीच्या पात्रामध्ये उजव्या बाजूने गॅस पाईपलाईन टाकण्याची परवानगी अटी व शर्तीनुसार देण्यात आली आहे.सदर भीमा नदीच्या पात्रामध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम हे जलसंपदा विभाग, चासकमान पाठबंधारे विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या मार्फत परवानगी देण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग, पुणे या विभागाचा काहीही संबंध येत नाही. तरी आपणास यासंदर्भात माहिती हवी असल्यास संबंधित विभागास पत्रव्यवहार करावा. तसेच मा.जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिलेल्या परवनागीमध्ये अट क्र.१ नुसार गॅस पाईपलाईन गळतीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्यास टोरेंट गॅस पुणे लि. हे सर्वस्वी जबाबदार राहणार आहेत असे नमूद केलेले असून तसे हमीपत्र पण त्यांनी दिलेले आहे. तरी टोरेंट गॅस पुणे लि. यांना आमच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला पुढील आदेश होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सदर हमीपत्र व मा.जिल्हाधिकारी, पुणे यांनी गॅस पाईपलाईन टाकण्यास दिलेल्या परवानगीचे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. असे पत्र बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कदम यांनी लता शिरसाठ यांनी दिलेल्या पत्रावर लेखी उत्तर दिले आहे.