Saturday, July 27, 2024
Homeक्राइमटुरिस्ट व्यावसायिकाची अवघ्या ५०० रुपयांसाठी हत्या करत स्वतःवर केले वार

टुरिस्ट व्यावसायिकाची अवघ्या ५०० रुपयांसाठी हत्या करत स्वतःवर केले वार

पुण्यातील जुन्नर तालुक्यात गॅरेज कामगाराने अवघ्या ५०० रुपयांसाठी टुरिस्ट व्यावसायिकाची हत्या करत स्वतःवर ही वार करून घेतले असून आरोपीला तत्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे – पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर येत आहे. अवघ्या ५०० रुपयासाठी एका गॅरेज कामगाराने टुरिस्ट व्यावसायिकाची हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वत:लाही वार केले. ही घटना मंगळवारी रात्री २४ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात ५०० रुपये कमी दिल्याच्या रागातून झालेल्या टोकाच्या वादात टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष गोडसे यांची हत्या केल्याची धक्कादायक पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे मंगळवारी (दि. २४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज कामगाराने स्वतःवरही वार करुन घेतल्याचा प्रकार घडला आहे. विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय-४२ रा. पिंपळवंडी ) असे खुन झालेल्या टुरिस्ट व्यावसायकाचे नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी (रा. राजुरी) असे खुन केलेल्या गॅरेज कामगार आरोपीचे नाव आहे.आरोपी मयूर सोमवंशीवर याअगोदरही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात सचिन भिमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्याद दाखल केली आहे असून , मित्र विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याची क्रुझर गाडी (एमएच १४ डीटी ५३०८) एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरुस्ती बिलाच्या ७ हजार ६०० पैकी ७ हजार १०० रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला ५०० रुपये देणे बाकी होते. उर्वरित ५०० रुपयासाठी मयुरने गोडसेकडे फोनवर सारखा तगादा लावला होता.मंगळवार सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांना फोनवरून शिवीगाळ करत गॅरेजवर ये तुला बघून घेतो अशी धमकी दिली. संतोष आळेफाटा चौकातून लगेच गॅरेजकडे गेला. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला.यातून आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वार केले.आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले.

त्यानंतर जखमी संतोष गोडसे यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.नंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्या विरोधात भादवि कलम ३०२, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.

पोलीस बंदोबस्तात आरोपीवर उपचार सुरू – मयूर सोमवंशीवर उपचार सुरु टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याचा खून केल्यानंतर आरोपी गॅरेज कामगार मयूर सोमवंशी याने स्वतःवरही वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रात्री दाखल केले. त्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!