Wednesday, September 11, 2024
Homeक्राइमज्योतिषा कडून मुहूर्त काढत टाकला एक कोटी रुपयांचा दरोडा पोलिसांनी चोरांसह ज्योतिषालाही...

ज्योतिषा कडून मुहूर्त काढत टाकला एक कोटी रुपयांचा दरोडा पोलिसांनी चोरांसह ज्योतिषालाही ठोकल्या बेड्या

पुणे – ज्योतीषाकडून मुहुर्त काढून, महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यासह सुमारे एक कोटी रूपयांचा ऐवज दरोडा टाकून जबरीने चोरून नेणारे दरोडेखोरांना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुहूर्त काढून देणारा ज्योतिषाचाही आरोपींमध्ये सामावेश असून पोलिसांनी ज्योतिषालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरोडा टाकणारे आरोपी हे एमआयडीसीतील मजुर कामगार असून रामचंद्र वामन चव्हाण वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती, ज्योतीष, मुळ रा. आंदरूड सातारा सध्या रा. वडुज, सातारा या ज्योतीष शास्त्र पाहणारे आरोपीस कटात सामील करून घेवून त्याचेकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढून त्याचे मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या आरोपीस देखील अटक करण्यात आली आहे.(Pune Crime News)

बारामती शहरात लोक वस्तीत रहदारीचे वेळी घटना घडल्याने परीसरात व बारामती शहरात खळबळ उडाली व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हयाची व्याप्ती व गांर्भीय मोठे होते. घटनेचा प्रकार पाहता, गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी काही योजना तयार करून मार्गदर्शन केले आणि दर आठवड्याला सदर गुन्ह्याचे बाबत मागोवा घेतला. गुन्हा करणारे आरोपींनी आपण पकडले जावू नये याकरीता सर्वोतोपरी काळजी घेवून कोणताही मागमूस ठेवला नव्हता. नेमलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही चे प्राप्त फुटेज मधील आरोपींचे वर्णन, पेहराव असे बारकावे तपासून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर गुन्हयाची उकल केली आणि गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. (Pune Crime News)

याबाबत पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील देवकाते नगर येथे सागर शिवाजी गोफणे, दिनांक २१ एप्रिल रोजी तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेलेले घरी पत्नी तृप्ती गोफणे व दोन लहान मुलासह घरी असताना चार अनोळखी चोरटयांनी घराचे कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश केला. तृप्ती गोफणे यांना मारहाण करत हातपाय बांधले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम ९५ लाख ३० हजार रूपये रोख रक्कम व सुमारे २० तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रूपयांचे तीन मोबाईल असा एकूण १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रूपये किंचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. त्याबाबत तृप्ती सागर गोफणे यांनी गुन्हा दाखल केला होता. (Pune Crime News)

गुन्हयातील आरोपी हे एमआयडीसीतील मजुर कामगार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संशयित आरोपींचे हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रीत करत आरोपी १) सचिन अशोक जगधने, (वय ३० वर्षे) , बारामती, २) रायबा तानाजी चव्हाण, वय (३२ वर्षे), व्यवसाय चालक, रा. शेटफळ , इंदापूर, ३) रविंद्र शिवाजी भोसले, (वय २७ वर्षे), रा. निरा वागज, बारामती, ४) दुर्योधन ऊर्फ दिपक ऊर्फ पप्पु धनाजी जाधव, (वय ३५ वर्षे), रा. जिंती,फलटण, ५) नितीन अर्जुन मोरे, वय ३६ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस, सोलापूर, यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळया पथकाने बारामती तालुका परीसर, मेखळी, अशा वेगवेगळ्या परीसरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. (Pune Crime News)

सागर गोफणे हा जमीन खरेदी विक्री चा व्यवसाय करत असून त्याचेजवळ भरपूर पैसे असलेबाबत माहिती आरोपी नामे सचिन जगधने यास मिळाली होती, त्याने गुन्हयाचा कट रचला तसेच सदरचा गुन्हा करणे पुर्वी आरोपींनी आरोपी ६) रामचंद्र वामन चव्हाण वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती, ज्योतीष, मुळ रा. आंदरूड फलटण सातारा सध्या रा. वडुज, सातारा या ज्योतीष शास्त्र पाहणारे आरोपीस कटात सामील करून घेवून त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढून त्याचे मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या आरोपीस देखील अटक केली असून आरोपींकडून ७६ लाख ३२ हजार ४१० रूपये किं चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये ६० लाख ९७ हजार रुपये रोख रक्कम व १५ लाख ३५ हजार ४९० रूपये किंमतीचे २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करणेत आलेले आहेत. (Pune Crime News)

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,बारामती विभाग उपविभागीय अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. नेताजी गंधारे, राहुल गावडे, पो.स.ई. अभिजीत सावंत, प्रदीप चौधरी, शिवाजी ननवरे, अमित सिदपाटील, गणेश जगदाळे, सफी रविराज कोकरे, बाळसाहेब कारंडे, पो.हवा. सचिन घाडगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, पो.ना.अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, अक्षय सुपे यांनी केली असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पो.नि. प्रभाकर मोरे, पो.स.ई.राजेश माळी, तुषार भोईटे, संदिप वारे, पो.कॉ धिरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, चासफी मुकुंद कदम, प्रमोद नवले, चापोकों दगडू विरकर,पो.शि.दिपक दराडे हे करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!