Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांनी उज्वल भविष्य घडवण्यासाठी नेहमी मोठी स्वप्न पहावीत - आमदार अशोक पवार

विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्य घडवण्यासाठी नेहमी मोठी स्वप्न पहावीत – आमदार अशोक पवार

ज्या दिवशी आपल्यातील वेगळेपण लक्षात येते त्या दिवशी जगणं सुंदर होत. – गणेश शिंदे

कोरेगांव. भीमा – आपल्या आयुष्याला घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. ज्या दिवशी आपल्यातील वेगळेपण लक्षात येते त्या दिवशी जगणं सुंदर होत. तसेच आपल्यामध्ये नक्की काय चांगलं आहे ते ओळखायला हवे नोकरी म्हणजे सर्वकाही नाही. बाजारात आपले नाणे खणखणीत वाजायला हवे.इतर देशांना काlळत की भारतात काय विकले जाते तेच आपल्या तरुणाईला हे कळायला हवे. असे विचार प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.


सणसवाडी (ता.शिरूर) येथे जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेमध्ये आयोजित प्रेरणा दायक व्याख्यानामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यापुढे व्याख्याते गणेश शिंदे यांनी जाहिरातींमधून आपण काय शिकतो व त्याचा कसा वापर करतो याविषयी मार्गदर्शन करत कामगार होण्यापेक्षा आपण उद्योजक व्हायला हवे.एका तरुणाच्या उदाहरणामधून दुबईत बॅनर लावणार चला जेजुरी पाहायला, इथे त्यांना आणून गडावर आणून कॅलरी बर्न झाल्याचे सांगून रात्री दोन हजाराचे तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ दाखवणार अशी जिविषा मनात ठेऊन चाकोरी बाहेर जाऊन स्पर्धेत टिकायला हवे बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे.

आमदार अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला यावेळी कृषी पदवीधर असलेल्या आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना शेतीशी निगडित प्रश्न विचारला बाळांनो सांगा बर आंब्यांच्या जाती किती ? तसेच कोणते झाड कोठे लावायचे , कोणत्या झाडाचा काय फायदा असे मार्गदर्शन करत हितगुज साधले यावेळी आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. मोबाईल ही गरजेची वस्तू आहे काळानुरूप तिचा वापर व्हावा पण फक्त मोबाईल म्हणजे सर्वकाही अस नाही .विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेक टाळावा तसेच मोबाईलचा नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य शिकण्यासाठी व ज्ञान मिळवण्यासाठी स्मार्ट वापर करावा. पुस्तक वाचन वाढायला हवे.तसेच यावेळी शिक्षक व पालकांना मोलाचं सल्ला देत शाळेत प्रार्थनेच्या वेळी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांना बक्षीस देत त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी success या शब्दाचा अर्थ समजावून सांगत आपण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कष्ट घ्यायलाच पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले.
शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी येथील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आयावेकी आपण आयुष्यात मोठी स्वप्न पहावी असे मर्डमगदर्षन करत आमदार अशोक बाप्पु पवार यांनी शिरूर तालुक्यातील अनेकजण अधिकारी आहेत. आय ए एस,आय पी एस,आय एफ एस अशा पदासाठी प्रयत्न करायला हवा.एम पि एस सी , यु पि एस सी परीक्षा देत उज्वल आयुष्य घडवायला हवे.
आमदार अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला यावेळी कृषी पदवीधर असलेल्या आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना शेतीशी निगडित प्रश्न विचारला बाळांनो सांगा बर आंब्यांच्या जाती किती ? तसेच कोणते झाड कोठे लावायचे , कोणत्या झाडाचा काय फायदा असे मार्गदर्शन करत हितगुज साधले यावेळी आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. मोबाईल ही गरजेची वस्तू आहे तिचा योग्य वापर व्हावा पण फक्त मोबाईल म्हणजे सर्वकाही आहे अस नाही .विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेक टाळावा तसेच मोबाईलचा नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य शिकण्यासाठी व ज्ञान मिळवण्यासाठी स्मार्ट वापर करावा. पुस्तक वाचन वाढायला हवे.


तसेच यावेळी शिक्षक व पालकांना मोलाचा सल्ला देत शाळेत प्रार्थनेच्या वेळी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांना बक्षीस देत त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.
यावेळी आमदार अशोक पवार व इतर मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार केला.
यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सणसवाडी ग्राम नगरीच्या सरपंच सुवर्णा रणादास दरेकर,उपसरपंच दत्तात्रय हरगुडे,माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर,स्नेहल राजेश भुजबळ, संगीता नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते,रुपाली दरेकर,ललिता दरेकर,तनुजा दरेकर, राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, राहुल हरगुडे, मोहन हरगुडे,ग्रामसेवक बाळणाथ पवणे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी मार्केट कमिटी सदस्य दत्तात्रय हरगुडे ,शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे मॅडम, ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती, शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या व्याख्यानाचे आयोजन उद्योजक रामदास दरेकर, व मित्र परिवार यांनी केले होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!