हेलिकॉप्टर मधुज पुष्पवृष्टी, सशसस्त्र मानवंदना, मर्दानी खेळ,रक्तदान शिबिर,महाप्रसादाचे आयोजन
कोरेगाव भिमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांची कारकीर्द दैदिप्यमान होती, शासन यंत्रणेचा मध्यबिंदू म्हणून संभाजी महाराजांनी काम केल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात प्रजेला स्वास्थ्याची आणि स्थैर्याची हमी देणारे तसेच बुधभूषण ग्रंथात राजाची कर्तव्ये स्पष्ट सांगत अनुकरण करणारे, तसेच ज्ञानसत्ता, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा सुवर्णकाळ म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द असल्याचे प्रतिपादन राहुल सोलापूरकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात केले.
यापुढे बोलताना राहुल सोलापूरकर यांनी छञपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची,धैर्याची व बलिदानाची तसेच राज्यकारभार , युद्धनिती याविषयी ऐतिहासिक दाखले देत व्हॉट्स ॲप विद्यापीठात पाडवा व छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येबाबत स्पष्टीकरण देत पाडवा उल्लेख व साजरा केल्याचा अनेक ऐतिहासिक दाखले दिलें संभाजी महाराज यांच्या उपलब्ध ६५ पत्रांचा उल्लेख करत २ संस्कृत पत्रे सांगितली. स्वराज्य विभागणी नको मी स्वराज्याचा सेवक म्हणून राहील असे सांगत संभाजी महाराजांचे बलिदान हे आपल्या कायम स्मरणात राहिले पाहिजे त्यांच्या जाज्वल्य व दैदिप्यमान इतिहासाची मांडणी राहुल सोलापूर यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे यांनी शासनाच्या माध्यमातून होणारा विकास ऐतिहासिक पावित्र्य राखून विकास करण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष्यसिंह महाराज यांनी आपण मला बोलावून मेवाडच्या पवित्र भूमीचा सन्मान केला आहे तसेच हजारो किलोमीटर लांब असूनही ही भूमी माझी मातृभूमी असून माझ्या आईच्या कुशीत असल्यासारखे वाटते, स्वातंत्र्य व बलिदान यासाठी छञपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचे नाव घेतले जाते. आज मिळालेले स्वातंत्र्य रक्त सांडून मिळाले असून आपण त्याची जाणीव राखायला हवी. १९ वे शतक इंग्लंडचे, २० वर शतक अमेरिकेचे होते तर २१ भारताचे शतक आहे असल्याचे सांगत छञपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला विसरू नये असे सांगितले.
पहाटे सहा वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण म्हणून मुक पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी हजारो शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
पुण्यतिथी निमित्त पहाटे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने श्री शंभू छत्रपतींच्या समाधीची महापूजा सकाळी ८ वा. शासकीय महा जिल्हाधिकारी सुहास दिवसे , मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलयांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, प्रांत स्नेहल देवकाते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, डी वाय एस पि प्रशांत ढोले, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, पोलीस निरीक्षक राजरतन गायकवाड, विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड, शंभू भक्त उपस्थित होते
सकाळी १० ते ११ या वेळात जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या उपस्थितीत ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांचे धर्मवीर श्री शंभू छत्रपतींचे बलियादान या विषयावरील कीर्तनानंतर वेद मंत्रांच्या घोष करण्यात आला.मर्दानी खेळ व सशस्त्र मानवंदना आणि शासकीय मानवंदना देण्यात आली तर १२.४३ ला हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी आयोजित रक्तदान शिबिरास शंभू भक्तांनी सहा वाजेपर्यंत ५०० बाटल्या रक्तदान केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले ,खासदार अमोल कोल्हे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार अशोक पवार, आमदार महेश लांडगे, माजी सभापती सविता पऱ्हाड, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, अपूर्व आढळराव , शिक्रपुरचे सरपंच रमेश गडदे यांनी शंभू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतले. यावेळी शंभू भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी येथे ओशाळला मृत्यू हा नाट्य प्रयोग संपन्न झाला.
यावेळी सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ, माजी सरपंच सारिका अंकुश शिवले, अनिल शिवले, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, मिलिंद एकबोटे, नंदू एकबोटे, लक्ष्मण भंडारे , शांताराम भंडारे, ग्राम पंचायत सदस्या संगीता सावंत, ज्ञानेश्वर भंडारे, कृष्णा आरगडे वैभव भंडारे, संगीता सावंत, रेखा शिवले, शीलावती भंडारे, रोहिणी भंडारे, अनिता भंडारे, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, ग्रामसेवक भाकरे साहेब, तलाठी रमेश घोडे, बापूसाहेब आहेर, पोलीस पाटील जयसिंग भंडारे,विर बापूजी शिवले स्मारक अध्यक्ष संतोष शिवले, सचिन भंडारे,माजी ग्राम पंचायत सदस्य अनिल भंडारे, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरी शिवले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व युवा मंच कार्यकर्ते, व ग्रामस्थ व शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मृती समितीच्या वतीने देण्यात आलेले पुरस्कार- ‘छञपती संभाजी’ या हिंदी चित्रपटाचे निर्माते राकेश दुलगज यांना धर्मवीर छञपती संभाजी महाराज पुरस्कार देण्यात येणार असून ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे, धर्मवीर सेनेचे अक्षय महाराज भोसले, लेखक निलेश भिसे, दत्ता बुटे व मित्रपरिवार यांना शंभू सेवा पुरस्कार देण्यात आला.