Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्याजे घडले आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे घडलेल आहे - उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस

जे घडले आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे घडलेल आहे – उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पहाटेच्या शपथ विधिपसून सुरू झालेली वाटचाल अखेर दुपारच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचली असून तीन वर्षात तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सध्याच्या राजकीय पटलावरील केंद्रबिंदू अजित पवार असून राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणून एकत्रित दिसणार आहेत.

राज्यातील सत्तेच्या पटावर खूप मोठ्या राजकीय घडामोडी होत असून तीन वर्षात पहाटेचा शपथ विधी ,शिवसेना पक्षातील बंड, गुवाहाटी दौरा,काय झाडी काय … डोंगार… ते घुसमट, हिंदुत्वाचा विचार , नागरिकांच्या विकासापर्यंतची कारणे देत राजकीय घडामोडी वेगाने होत आहेत.
या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रस्थानी असून भाजपला राज्यात प्रबळ करण्यासाठी व विरोधी गटातील ताकदवान, प्रभावी नेतृत्व आपल्या सोबत आणण्याची सत्तेत सहभागी करून घेण्याची व राजकीय पटावरील अचूक व वेगवान चालिंची व बुद्धिमत्तेची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे घडले आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे घडलेल आहे.यातून महाराष्ट्रात नवीन विकासाचा अध्याय लिहू एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार व मी आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि एक अतिशय प्रगल्भ , पुरोगामी , विकास देणार सरकार आम्ही देऊ असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सध्याचे राज्यातील सरकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( शिंदे गट शिवसेना) ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजपा) तर अजित पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस) असे तिघांचे सरकार बनले आहे.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी आज महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले असून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. नव्या सरकारमध्ये फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असे दोघे उमपुख्यमंत्री असणार आहेत. पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्यासोबत मंत्री
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांपैकी दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील व संजय बनसोडे यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.


राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी होत असताना तीन वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीनवेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून पहाटेच्या शपथ विधीपासून सुरू झालेली वाटचाल दुपारच्या शपथ विधीपर्यंत पोचली असून भविष्यात नेमकी काय घडामोड होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच बारामती मध्ये फटाकड्यांची आतषबाजी करण्यात आली.

मंत्री पदाची संधी मिळणार तरी कुणाला –
मंत्री पदासाठी इच्छुक आमदारांची नाराजी वाढणार असून मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हटल्यावर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. भाजप व शिंदे गटातील आमदार, माजी मंत्र्यांनाही मंत्रिपद मिळण्याची आशा पल्लवित झाली होती.पण, आता राष्ट्रवादीतील नऊ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारचे तेवढेच मंत्रिपदे कमी होणार आहेत. त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळात २८ मंत्री झाले असून आता १५ मंत्रिपदे उरली असून त्यात कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेलेल्यांच्या भविष्याची चिंता वाटते – शरद पवार
पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी, दोन दिवसांपूर्वी मोदींनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होतं. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं म्हटलं होतं. मला आनंद आहे की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली त्यामुळे त्यांनी या आरोपातून राष्ट्रवादीला मुक्त केलं. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला बैठक बोलावली होती. त्यात संघटनात्मक निर्णय घेणार होतो. मात्र आम्हीच पक्ष असल्याची भूमिका काहींनी मांडली. अन्य विधीमंडळ सदस्यांची भूमिका दोन तीन दिवसांत स्पष्ट होईल. जे काही घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला, तरी आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाणार आहोत. आमची खरी शक्ती कार्यकर्ते आहेत, मला महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असेही पवार यांनी सांगितले.

पक्ष फुटला, घर फुटले अस म्हणणार नाही – शरद पवार
पक्ष फुटला, घर फुटले या पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी अजित पवार व सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असं मी म्हणेल, असंही शरद पवार म्हणाले . माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सहकाऱ्यांची भूमिका येत्या २ ते ३ दिवसात स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.
१९८० साली मला ५६ आमदार आम्हाला सोडून गेले. त्यावेळी ५ ते ६ आमदार घेऊन पुन्हा पक्ष उभा केला. ही माझ्यासाठी नवी गोष्ट नाहीये. मी पुन्हा लोकांच्या मध्ये जाईल आणि त्यांना माझा निर्णय सांगेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवार यांच्यासह इतर ९ जणांवर कारवाई होणार असल्याचं शरद पवारांनी संकेत दिले आहेत.
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रोहित पवार त्यांच्यासह दिसले. त्यावेळी त्यांनी मोदींना टोला लगावला.

राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी – अजित पवार
शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदा घेतली त्यावेळी त्यांनी शुक्रवारी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, असा अजित पवार (Ajit pawar) यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबत देखील जाऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.
प्रत्येक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. उद्याच्या काळात आम्ही पक्ष म्हणून समोर येणार आहोत. कुठल्याही निवडणुका असोत त्याच पक्षाच्या चिन्ह, नाव यातून निवडणूका लढवणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे व खासदार संजय राऊत यांनी ट्विटर द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!