Monday, June 17, 2024
Homeक्राइमजुन्नर जवळ नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघातामध्ये दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू

जुन्नर जवळ नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघातामध्ये दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू

मृतांमध्ये भाजी विक्रेत्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश

पुणे – नगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील अंजिराची बाग परिसरात ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून अपघाताची तीव्रता इतकी भयानक होता की एवढा भीषण होता की, यामध्ये तिन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.या तिहेरी अपघातात दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. (8 people including two children died on the spot in a horrific accident on the Nagar-Kalyan highway near Junnar)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नावे अद्याप समोर आली नाही. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे त्यांच्या रिक्षाला ट्रक आणि पिकअपने जोरदार धडक दिली.हा अपघात (Accident) इतका भीषण होता, की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत गणेश मस्करे, कोमल मस्करे त्यांची दोन चिमुकली मुलं, यांच्यासह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आठही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!