Wednesday, September 11, 2024
Homeइतरजिल्ह्यातील सर्व कुस्ती रसिकांनी ४ एप्रिल ते ९ एप्रिल कुस्त्यांचा आनंद घ्यावा;...

जिल्ह्यातील सर्व कुस्ती रसिकांनी ४ एप्रिल ते ९ एप्रिल कुस्त्यांचा आनंद घ्यावा; असे आग्रहाचे निमंत्रण – साहेबराव पवार

प्रतिक मिसाळ सातारा

सातारा – सातारा तब्बल साठ वर्षानंतर सातारा शहरामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६४ वे अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. यापूर्वी १९६३ ला सातारा शहरांमध्ये शाहू कला मंदिर येथे कै.बाळासाहेब देसाई व यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग जाधव , शिंगरे पैलवान अधिवेशन पार पडले होते.

याबाबत साहेबराव पवार यांनी “यावर्षी हा बहुमान जिल्हा तालीम संघाला शरद पवार यांच्या आग्रहामुळे यजमानपद मिळाले आहे. तब्बल ६२ वर्ष माझ्या जीवनाचे तालीम संघ उभारणे व तो यशस्वीरीत्या चालवणे हे माझे कर्तव्य व जबाबदारी समजून पार पाडलेले आहे संस्था उभारणे सोपे पण चालवणे फार कठीण आहे आणि आज याच जिल्ह्यातली जिल्ह्याचा मानबिंदू असलेली जिल्हा तालीम संघ सातारा व तालीम संघ सातारा या दोन्ही संस्था अतिशय दिमाखाने व डौलाने उभी आहेत सर्व सातारकरांना व महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व पैलवानांना आग्रहाचे निमंत्रण आज या पत्रकाद्वारे देत आहे स्पर्धा ही केवळ एका संस्थेची नसून जिल्ह्यातील सर्व कुस्तीगीर व शौकिनांचे आहे सध्या नवीन पिढीकडे कारभार दिलेला आहे आणि अत्यंत चोख पद्धतीने काम करीत आहेत याचा मला अभिमान आहे. म्हणून कुणी काही बोलत काय करतं याच्या खोलात मी न जाता या स्पर्धेमध्ये सर्व मनातल्या शंका कुशंका काढून सामील व्हावं अतिशय आशावादी यावर्षी परस्थिती आहे असे मत व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील नागरिकांना स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा पाहण्यासाठी सहभागी व्हावे ही विनंती सदर प्रसंगी जिल्हा तालीम संघाचे संपतराव साबळे, पैलवान दादा थोरात महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे चंद्रकांत सूळ आबा सूळ यशवंत चव्हाण ,वैभव फडतरे, संदीप साळुंखे, नितीन राजगे कांता पैलवान शेवाळे गुरुजी सुदाम पावणे नलवडे सर कुस्तीगीर परिषदेचे प्रतिनिधी माणिक पवार बबन साबळे रुस्तम तांबोळी रामदास शिंगटे जीवन कापले व तालीम संघाचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!