सुजाता पवार यांनी कंपनी व्यवस्थापना बाबत तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी
कोरेगाव भीमा – दिनांक ५ मार्च
पुणे- ट्रॅन्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही सूचना न देता कामावरून घरी बसवल्याच्या निर्णयाविरुद्ध कामगार कुटुंबासह आमरण उपोषणाला बसले असून याबाबत आमदार अशोक पवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली असता कामगार मंत्र्यांनी याबाबत कामगार आयुक्त व जिल्हाधिकारी यांना कामगारांच्या प्रशनाविषयी लक्ष देण्याचे पत्र देताच आज दिनांक ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख,कामगार आयुक्त यांच्या उपस्थित बैठक पार पडली .
यावेळी माजी सभापती सुजाता पवार यांनी कंपनी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले जात असून त्यांचे प्रपंच उघड्यावर आणण्याचा कुटील डाव रचण्यात येत असून कामगारांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाचा प्रश्न उपस्थित होत असून महिला भगिनी उपोषणाला बसल्या असून त्यांच्या जीविताची काळजी वाटत आहे यासाठी तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे मत मांडत कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
या बैठकीसाठी डॉ राजेश देशमुख,कामगार आयुक्त ,माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार,सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,संचालक राजेंद्र नरवडे,संचालिका सुजाता नरवडे, जिल्हा कामगार युनियन अध्यक्ष ढोकले, कमागर युनियन अध्यक्ष राजेंद्र दरेकर,कमावांनी व्यवस्थापनाचे एच आर तिवारी व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थित बैठक पार पडली असून याबाबत उद्या ५ मार्च रोजी निर्णय होणार असल्याबाबत माहिती मिळाली आहे.