कोरेगांव भीमा – जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत होते यावेळी मराठा बांधवांवर लाठीहल्ला करण्यात आला यावेळी काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून याबाबत राज्यात विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत असून याबाबत शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला निषेधार्थ आहे अशी प्रतिक्रिया दिली.
कुठलेही आंदोलनात हित असताना त्यांना समजून उमजून घेणे हे काम प्रशासन व सरकारचे असते. मराठा बांधवांवर झालेला लाठीहल्ला हा शंभर टक्के निषेधार्य आहे.सरकारने एक भूमिका मांडून त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.अशा प्रकारचा हल्ला कोणावरही होऊ नये ही ठामपणे मागणी आहे.