Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याजल जीवन मिशनचे काम सुरू होण्याअगोदर पाईप येतात, यांच्या दर्जा व कामाबाबत...

जल जीवन मिशनचे काम सुरू होण्याअगोदर पाईप येतात, यांच्या दर्जा व कामाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे – आमदार अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे जल जीवन मिशन योजनेचे उद्घाटन

कोरेगाव भिमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) जल जीवन मिशन अंतर्गत शिरूर तालुक्यात एक हजार कोटींची कामे सुरू आहेत. जल जीवन मिशन योजना चांगली आहे पण कॉन्ट्रॅक्टर मनमानी कारभार करताना दिसतात.जल जीवन मिशनचे काम सुरू होण्याअगोदर पाईप येतात, यांच्या दर्जा व कामाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे असा इशारा देतानाच गावाचे काम आहे म्हणून दुर्लक्ष करू नये, निकृष्ट व दर्जाहीन काम चालू असल्यास तातडीने तक्रार करा दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण काम व्हायलाच हवे असे आमदार अशोक पवार यांनी जल जीवन मिशन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी सांगत ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण काम करण्याचे बजावले.

श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील अकरा कोटी पंच्याहत्तर लाख चवऱ्याहत्तर हजार चौपन्न रुपयंचे जल जीवन मिशन योजनेचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार पवार यांनी जल जीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
यापुढे बोलताना आमदार पवार यांनी जल जीवन मिशन योजेनेची कामे दर्जेदार राष्ट्रीय महामार्ग,प्रमुख राज्य महामार्ग,राज्य महामार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग असे सहा प्रकारचे रस्ते असून त्याच्या निकषानुसार अंतर सोडून रस्ता सोडून पाईप लाईन टाकून काम करावे ,तीन फुटांच्या खाली पाईप असावेत,अनेक ठिकाणी रात्रीची कामे केली जातात तसे ह कामाच्या गुणवत्ता व दर्जा याबाबत सर्वांनी जागरूक राहायला हवे असे मार्गदर्शन करत आपल्या गावाचा विकास आपल्या हातात असल्याचे सांगितले.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकी करणामुळे नागरीकरण वाढत असून येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी सरपंच सारिका शिवले माजी सरपंच व चेअरमन प्रफुल्ल शिवले,अंकुश शिवले, अनिल शिवले ,माजी उपसरपंच लाला तांबे ,संतोष शिवले, शंकर वामन शिवले, ग्रामपंचायत सदस्य अंजली शिवले,संगीता सावंत, माऊली भंडारे , कृष्णा आरगडे , वैभव भंडारे माजी चेअरमन भाऊसाहेब शिवले, संचालक आनंदा शिवले माजी सरपंच साहेबराव भंडारे, महादेव भंडारे पांडुरंग आरगडे माजी सरपंच धर्मा वाजे, आबा पराड, ग्रामसेवक शंकर भाकरे भाऊसाहेब, मारुती ढेरंगे, अशोक ढेरंगे, अरविंद भंडारे उपस्थित होते.


एक लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्यासाठी शंभू नगरी येथे हवेली पंचायत समिती सदस्य शाम गावडे व पिंपळे जगताप रस्त्याच्या बाजूला दीड लाख लिटर पाण्याच्या टाकी साठी भाऊसाहेब शिवले यांनी प्रत्येकी एक गुंठा विनामोबदला जागा देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सन्मान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब शिवले यांचा विशेष नामोल्लेख करण्यात येऊन गावच्या शाळेसाठी पाच गुंठे, मंदिरासाठी एक गुंठा व सध्या पाणी योजनेसाठी एक गुंठा अशी गावासाठी सात गुंठे जागा दान देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे

फेसबुकवर चमकोगिरी करत निधी आणल्याचा कांगावा करणारे –
आमदार अशोक पवार यांनी वढू बुद्रुक येथे प्रसिद्धी साठी काहीजण फेस बुकला फोटो टाकून आमच्यामुळे निधी आणला असा दिखावा करतायेत पण मूळ संकल्पना व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत त्यांचे जीवन सुसह्य करणे हे कधीही चांगले.
यावेळी आमदार पवार यांनी फेसबुक चामाकोगिरी करणाऱ्यांचा नामोल्लेख
करणे टाळले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!