Monday, October 14, 2024
Homeसाहित्य/सामाजिकजल जिवन मिशन साठी पी. डी पाटील सहकारी गृह निर्माण संस्थेची स्वामालकीची...

जल जिवन मिशन साठी पी. डी पाटील सहकारी गृह निर्माण संस्थेची स्वामालकीची जागा गोवारे ग्राम पंचायत ला हस्तांतरित


कराड प्रतिनिधी हेमंत पाटील

कराड -गोवारे (ता.कराड )या गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेकरिता जागेची आवश्यकता होती, त्याकरिता पी.डी.पाटील सहकारी गृहनिर्माण संस्था, कराड यांनी स्वमालकीची जागा गोवारे ग्रामपंचायतकडे हस्तांतरित केली. त्या जागेच्या हस्तांतरणाचे दस्तावेज संस्थेचे अध्यक्ष मारुती हरी पाटील यांनी कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार व आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते गोवारे गावचे सरपंच वैभव बोराटे यांच्याकडे सुपूर्द केले.

याप्रसंगी गजानन सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील , संस्थेचे संचालक सचिन कटवटे, भीमराव पाटील, सुनील वडगांवकर, सचिव इस्माईल मुजावर, गोवारेचे उपसरपंच विजय पाटील, सदस्या शुभांगी कोळगे, मीनाक्षी कदम, ज्योती गुरव, कविता देशमुख, शर्मिला गुजट्टी , छाया महाडिक, अजित पाटील , शशंकर कोळगे, संजय देशमुख जयवंत महाडीक सचिन गुरव ,तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व्ही.डी.वायकर, उप कार्यकारी अभियंता पी.के.कुलकर्णी, शाखा अभियंता एस.के भोपळे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!