Monday, October 14, 2024
Homeताज्या बातम्याजय अंबिका कला केंद्रास सणसवाडी ग्राम पंचायतीची जप्तीची नोटीस थकविला लाखो...

जय अंबिका कला केंद्रास सणसवाडी ग्राम पंचायतीची जप्तीची नोटीस थकविला लाखो रुपयांचा कर

 कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील जय अंबिका कला केंद्राने ग्रामपंचायतीचा १५,७४,६३७ रुपयांचा कर थकविल्याने अखेर ग्राम पंचायतीच्या वतीने जय अंबिका कला केंद्रास जप्तीची नोटीस फर्मावली आहे.विशेष म्हणजे दुसऱ्या पूजा कला केंद्राकडून कर वेळोवेळी भरला जात आहे तर जय अंबिका कला केंद्र का कर भर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्यानंतर व्यवसायांची झालेली भरभराट यामुळे आर्थिक सधनता आली व मोठ्या प्रमाणावर हातात पैसा खेळू लागला उद्योगनगरी सणसवाडी ही ( ‘ सोन्याची वाडी’ ) असा नावलौकिक पावली. आणि या भागात जय अंबिका व पूजा कला केंद्रे येथे सुरू झाली. येथील जय अंबिका कलाकेंद्रात पारंपरिक लावणी जपल्याचे सांगितले जाते, त्याच कलाकेंद्राशी संबंधित सहा मिळकतींचे तब्बल १५ लाख ७४ हजार ६३७ रुपये कराचे थकविल्याने ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस देवून जप्तीच्या कारवाईची तयारी सुरू केली आहे.  

 मागील अनेक वर्षांपासून दिड डझनाच्यावर नृत्य पार्ट्या,नृत्यांगना यांची अदाकारी व बैठका दररोज जोरदार ,बहारदार, रंगतदार होतात. उत्पन्न मिळवणाऱ्या जय अंबिका कला केंद्राने स्थानिक ग्रामपंचायतीचाच कर थकविल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन दोन्ही संतापल्याने कलाकेंद्राला जप्तीची नोटीस पाठवली आहे.

  येथील अंबिका कलाकेंद्राच्या काही बांधकाम व काही मोकळ्या अशा ३५, १२४, १२५, १२६, १३१,१४४१, १४४२, १९५७, २८६६, ३०३१ या नंबरच्या सहा मिळकती आहेत. अशा सहा मिळकतींचे अनुक्रमे पाच लाख २१ हजार ६५८, सात लाख ४९ हजार ६४७, दोन लाख ७२ हजार ८८९, १८ हजार ७४९, दोन हजार ८६६, तीन हजार ३१ एवढे मिळून एकूण १५ लाख ७४ हजार ६३७ रुपये थकल्याने ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस देण्यात आली आहे.

वार्षिक ग्रामपंचायत कर सदर कलाकेंद्र नियमित भरत नाही. कधी तरी येऊन अगदी दोन-अडीच हजार रुपये भरून कर भरल्याच्या पावत्या ते घेऊन जातात. सद्यःस्थितीत थकीत कर तब्बल १५ लाख ७४ हजार ६३७ एवढा झाल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करून कारवाईचा निर्णय झाला. जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे 

       जय अंबिका कलाकेंद्राला आम्ही अनेक वेळा नोटिसा देवून पाहिले. मात्र, दादच देत नसेल तर आम्ही जप्ती कारवाई करून कर तर वसुल तर करणारच. शिवाय कलाकेंद्र ज्या पद्धतीने बांधले गेले आहे, तेथील परवानग्या, व्यावसायिक परवानग्या आणि तेथील शासनाचे बांधकाम नियम याची पुन्हा चौकशी व्हावी, म्हणून पीएमआरडीएकडेही पाठपुरावा करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीकडून दिला. 

मागील अनेक वर्षांपासून सणसवाडी ग्राम पंचायतीचा कर आम्ही भरत असून कोरोना मुके आर्थिक घडी विस्कटली असून कर भरायला उशीर झाला आहे. ग्राम पंचायतीचा थकीत कर भरण्यास आम्ही तयार आहोत.फक्त जास्तीचा व मोकळ्या जागेचा लावलेला कर कमी करण्यात यावा तसेच कर भरण्याचे टप्पे करून मिळण्यासाठी ग्राम पंचायतीला विनंती करण्यात येणार आहे – हनुमंत पवार,जय अंबिका कला केंद्र

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!