Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याजयंतीनिमित्त तुळापूरात शंभुराजेंना अभिवादन

जयंतीनिमित्त तुळापूरात शंभुराजेंना अभिवादन

हवेली तालुक्याचे वैभव व ऐतिहासिक ठेवा असलेल्या श्रीक्षेत्र तुळापुर येथे छत्रपती शंभुराजांच्या स्मृतीस्थळी पुण्यतिथी कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी भरीव निधीची व्यवस्था करण्याची ग्वाही हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तसेच संचालकांनी दिली.
श्रीक्षेत्र तुळापूर येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज यांच्या ३६६ व्या जयंतीनिमित्त तुळापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँकेचे संचालक विकासनाना दांगट, तसेच हवेली बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रविंद्र कंद, जेष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, सुदर्शन चौधरी, नानासाहेब आबनावे, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, संचालिका सारिका हरगुडे, नितिन दांगट, शशिकांत गायकवाड, सागर हरपळे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदीप भोंडवे, स्वप्निल उंद्रे, मिलिंदनाना हरगुडे, गणेश कुटे, संदेश आव्हाळे, सरपंच अँड. गुंफा इंगळे, उपसरपंच राजाराम शिवले, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, अमोल शिवले, गणेश पुजारी, माजी उपसरंपच नवनाथ शिवले, राहुल राऊत, राजाराम शिवले, पवन खैरे, संतोष शिवले, पेरणेचे उपसरपंच गणेश येवले, लोणीकंदचे सदस्य राहुल शिंदे, जयश्री शिवले, रविंद्र वाळके, बाबासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल शिवले यांनी छत्रपती शंभुराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी देण्याबाबत केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना विकासनाना दांगट तसेच सभापती उपसभापती तसेच उपस्थित संचालकांनी तुळापुरात शंभुराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी भरीव निधी मिळेल, अशी व्यवस्था शासन मान्यतेने करण्याचे आश्वासन दिले.
तर माजी सभापती व ज्येष्ठ संचालक रोहिदास उंद्रे यांनी येथील विकास आराखड्याची सुरुवात तत्कालीन आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांच्या पुढाकाराने झाल्याचे सांगत या प्रेरणास्थळासाठी तालुक्यातील सक्षम संस्थांनी भरीव मदत करणे गरजेचे असल्याचे सांगत पेरणे येथील उपबाजार आवाराला छत्रपती शंभुराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट केले. संतोष शिवले सुत्रसंचालन केले, अमोल शिवले यांनी प्रास्ताविक केले. तर नवनाथ शिवले यांनी आभार मानले

दरम्यान छत्रपती शंभुराजांच्या ३६६ व्या जयंतीनिमित्त समाधिस्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच तुळापूरातून ठिकठिकाणी ज्योती नेण्यात आल्या. तर पदाधिकारी व ग्रामस्थांनी समाधिस्थळी पुजाभिषेक व ध्येयमंत्र पठण करुन शंभुराजेंना अभिवादन केले. तसेच दुपारी व्याख्याते पडवळ यांचे व्याख्यानही झाले. दिवसभर शंभुराजांना अभिवादनासाठी शंभू भक्तांनी गर्दी केली होती.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!