Saturday, May 25, 2024
Homeक्राइमनिर्घृण खून...जमिन विकायची म्हणून दारू पिऊन भांडणाऱ्यास चुलता व चुलत भावाने बांबूने...

निर्घृण खून…जमिन विकायची म्हणून दारू पिऊन भांडणाऱ्यास चुलता व चुलत भावाने बांबूने मारहाण करत हातपाय बांधून टाकले घोड नदीत

शिरूर पोलिसांनी केला खुनाचा उलगडा 

 शिरुर – शिरुर शहरालगत घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरूणाच्या खूनाचा उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात शिरूर व स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीसांना यश आले आहे . कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२ वर्ष), रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार,जि. बीड असे खून झालेल्याचे नाव आहे . याप्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे.  

      मयत कृष्णा गोकूळ विघ्ने हा व्यसनी होता, तो कुटुंबात नेहमी जमीन विक्री करा असे म्हणून भांडण करत असल्याने आरोपींनी त्याला चारचाकी वाहन महिंद्रा जितो टेम्पो नं. एम. एच. १६ सी. डी. ३६८४ मध्ये आणून त्याचे हातपाय बांधून त्यास शिरूर शहरालगतचे घोडनदी पात्रात टाकून देण्यात आले व त्याचा खून करणेत आला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

     याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर येथील पाचर्णे मळा येथील घोडनदीपात्रात रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी पुरूष यास मारहाण करून काळया, लाल व पांढरे रंगाचे दोरीने हातपासुन पायापर्यंत ठिकठिकाणी बांधून घोडनदीत टाकण्यात आले होते . मृतदेह बरेच दिवस पाण्यात राहिल्याने मयताचा चेहरा व पूर्ण शरीर विद्रूप झालेले होते. प्रेताची ओळख पटविणेकामी प्रेताचे अंगावर केवळ कपडे, खिशात मोटर सायकलची चावी तसेच त्याचे डावे हाताचे अंगठयाजवळ M असे गोंदलेले होते. यावरून मयताची ओळख पटविणे अत्यंत आव्हानात्मक असताना केवळ याच पुराव्यांच्या जोरावर राज्यभर मिसींग व्यक्ती चेक करून, वर्तमानपत्रात प्रसिध्दी देवुन, बातमीदारांचा वापर करून अनोळखी मयत इसमाची ओळख पटवली पोलीस तपासामध्ये मयताचे नांव कृष्णा गोकुळ विघ्ने वय ३२ वर्ष, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि.बीड असे निष्पन्न झाले होते. 

मयत कृष्णा विघ्ने यास दारू पिण्याचे व्यसन होते त्यामुळे तो दारूच्या नशेमध्ये त्याचे नातेवाईकांना शिवीगाळ मारहाण करीत होता तसेच यातील आरोपी व त्यांचा जमिन विक्रीच्या पैशावरून वाटपावरून वाद होता त्या कारणावरून यातील आरोपी यांनी कृष्णा याला व्यसनमुक्ती केंद्रात नेतो असा बहाणा करून कृष्णाला बांबुचे दांडक्याने मारहाण करून त्यास दंडापासुन ते पायापर्यंत दोरीने बांधुन त्यास आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड येथुन आरोपी याचे गाडीमध्ये घातले व पुणे नगर रस्त्यावरील शिरुर जवळील सतरा कमान पुलावरून घोड नदीपात्रामध्ये जिवंत टाकुन त्याचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    मयताची ओळख पटल्यानंतर आरोपीच्या शोधाकरिता पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर या ठिकाणी वेगवेगळ्या टीम रवाना करून जागोजागी गुन्हयात सहभागी असणारे आरोपी १) अजिनाथ गोकुळ विघ्ने वय २६ वर्ष, रा. आनंदगाव, ता. शिरून कासार, जि.बीड २) गणेश प्रभाकर नागरगोजे वय २९ वर्ष, रा पीरसाहेब चौक, निबळक ,ता.जि. अहमदनगर ३) पाडुरंग अर्जुन विघ्ने वय ५० वर्ष, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, यांना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो.स्टे. चे पो. नि. ज्योतीराम गुंजवटे, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे तसेच शिरूर पोस्टे चे पोसई एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार अरूण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, सचिन भोई, संतोष साळुंखे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास सपोनि यादव हे करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!