Monday, November 4, 2024
Homeइतर“छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करण्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शक सूचना

“छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करण्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शक सूचना

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन क्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून त्याचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोवीड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजयंतीसाजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात येत आहे.

अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन “शिवजयंती” साजरी करतात परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन न करता याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करावी.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे ( उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!