Friday, September 13, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचौफुला येथील रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

चौफुला येथील रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कोरेगाव भीमा – दिनांक १४ ऑगस्ट

चौफुला ( ता.शिरूर) येथील मयुरी लॉन्स येथे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर हर घर तिरंगा यशस्वी हित असताना विधायक व समाजोपयोगी कामाच्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेने व जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदार संघात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रत्येक रक्तदात्यास सहभागी प्रमाणपत्र, रक्तदात्याला आयुष्यभर मिळणारा गरजेच्या वेळी रक्तनातेवाईकांना १ वर्ष फक्त मोफत ,तीन लाखांचा अपघाती विमा,तीन लाखांचा अतिरिक्त वैद्यकिय विमा,प्रत्येक रक्तदात्यास सहा लाखांचे विमा कवच देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशू संवर्धन माजी सभापती सुजाता पवार , सभापती मोनिका हरगुडे , विविध विकास सहकारी कार्यकारी सोसायटीचे चेरमान व माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, कोरेगाव भीमा सोसायटीचे चेअरमन बबुशा ढेंरगे,अशोक गव्हाणे,शिवाजी भोंडवे ,प्रशांत भोंडवे ,पोलीस पाटील जयसिंग भंडारे, माजी चेअरमन संजय शिवले, ग्राम पंचायत सदस्य माऊली भंडारे , गणेश शेळके ,राजू तांबे, जगदीश तिखे, दादा वाजे व चक्रेश्वर मेडिकल फाऊंडेशनचाकण ब्लड सेंटर येथील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्या व माजी सभापती सुजाता पवार रक्तदात्यांना प्रकणपत्र वाटप करताना उपस्थीत मान्यवर

खासदार अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. हा एक विधायक व समाजोपयोगी उपक्रम आहे.यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे .रक्तदान करत देशभक्ती व्यक्त करण्याचा हा स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम आहे. – माजी सरपंच प्रफुल्ल शिवले विद्यमान चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी , वढु बुद्रुक

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!