Monday, September 16, 2024
Homeक्राइमचोरांची गोष्टच न्यारी ... घरच्यांना मजुरी करायला जातो सांगून करायचे घरफोडी, गाड्या...

चोरांची गोष्टच न्यारी … घरच्यांना मजुरी करायला जातो सांगून करायचे घरफोडी, गाड्या चोरी

दोन चोरटयांकडून सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांच्या  १३ मोटार सायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची धडाकेबाज कारवाई  १४ मोटार सायकल चोरीचे व ०२ घरफोडी चोरीचे असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आणले 

खेड – चोरी करणाऱ्या आरोपींकडे कोणताही कामधंदा करायचे पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या मोटरसायकल असायच्या तसेच चोरी करायला जाताना हे आरोपी घरच्यांना मजुरी करायला जातोय असे सांगून घरफोडी, मोटार सायकल चोरी करायचे या तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या थिकल्या असूजुन्नर उपविभागात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलाने एक मोठी धडाकेबाज कामगिरी केली असून तीन आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार रुपयांच्या १३ गाड्या जप्त केल्या आहेत.

     जुन्नर उपविभागात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने  स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये जामीनावर सुटलेल्या आरोपींना तपासण्यास सुरूवात केली असता गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली की, इसम नामे संदीप दुधवडे, तुषार केदार, भाऊसाहेब दुधवडे हे काही कामधंदा करत नसून त्यांच्याकडे वेगवेगळ्या मोटरसायकल असतात. मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित इसमांची माहिती घेतली असता ते नारायणगाव येथील नंबरवाडी या ठिकाणी येणार असल्याने सापळा लावून १) संदीप बारकू दुधवडे वय (१८) रा.म्हसोबा झाप ता. पारनेर २) तुषार पांडुरंग केदार (वय २२) रा. पोखरी पवळदरा ता. पारनेर जि.अ. नगर यांना ताब्यात घेतले, चौकशीत त्यांनी खेड, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर परिसरातुन तसेच नगर भागातून काही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली असून गुन्हे करताना त्यांचे सोबत त्यांचा तिसरा साथीदार  भाऊसाहेब गंगाराम दुधवडे हा असल्याचे सांगितले आहे. 

     तसेच त्यांनी दोन घरफोड्या चोरी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सदर आरोपी हे रात्रीचे वेळी एकत्र येवून मजूरी कामासाठी जातो असे घरी सांगून विशेषतः स्प्लेंडर मोटार सायकलची चोरी करत असे. त्यांच्याकडून एकूण १३ मोटार सायकल ११ लाख ५० हजार रू. चालू बाजारभाव किंमतीच्या हस्तगत करणेत आलेल्या आहे.                     

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडून सन २०२३ मध्ये चोरी गेलेल्या एकूण ७० मोटार सायकल हस्तगत केलेल्या असून ४६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ,  उपविभागीय पोलीस अधिकारी  रविंद्र चौधर सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो स्टे चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!