Saturday, July 27, 2024
Homeइतरचुकीची बिले देणाऱ्या व वीज भरणा करूनही वीज कनेक्शन तोडणाऱ्या अनागोंदी कारभाराच्या...

चुकीची बिले देणाऱ्या व वीज भरणा करूनही वीज कनेक्शन तोडणाऱ्या अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध सोमवार पासुन पेरणे येथील विद्युत महावितरणच्या ऑफीस बाहेर चक्री उपोषण आंदोलन सुरु करणार .. पै संदीप भोंडवे

कोरेगाव भीमा – दिनांक २५ फेब्रुवारी पेरणे फाटा ( ता.हवेली) भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी वीज वितरण महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून , वाढीव वीज बिल देणे ,बंद असलेल्या कनेक्शनचे बिल येणे हे सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून शेतकऱ्यांना विजेच्या वापराप्रमाणे शासनाच्या नियमानुसार वीज बिल येणे आवश्यक असून अनागोंदी व भोंगळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे मत भोंडवे यांनी व्यक्त केले असून याबाबत शनिवार दिनांक २६फेब्रुवारी पर्यंत वीज जोड व बिलांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा पेरणे येथील विद्युत महावितरणच्या ऑफीस बाहेर चक्री उपोषण आंदोलन सुरु करणार असल्याबाबत इशारा पेरणे येथील सहाय्यक अभियंता अंकुश मोरे यांना भोंडवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

  शेतकऱ्यांनी शेतपंपाची चालु बिले भरलेली असताना ही पुर्व हवेलीमध्ये थकित विज बिले भरण्यासाठी  डी .पी. वरील विद्युत प्रवाह बंद करण्याचा प्रकार थांबवून शनिवार पर्यंत वीज प्रवाह सुरु नाही झाला तर सोमवार दीनांक २८ फेब्रुवारीपासुन पेरणे विद्युत महावितरण कार्यालयाच्या बाहेर सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने चक्री उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचा भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी इशारा दिला आहे .याबाबत संदीप भोंडवे यांनी पत्र प्रसिद्ध केले आहे ,त्यात  संविधानाने आपणास काही अधिकार दीलेले आहेत .सदर अधिकाराचे उल्लंघन करत शासन बळजबरीने वीज प्रवाह बंद करुन चुकीची बिले वसूल करण्याचे काम करत असेल तर आपणास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा अधिकार आहे .याबाबतीत संदीप भोंडवे यांनी शेतकऱ्यांना ५६ (१) ची नोटिस न देता वीज प्रवाह बंद करणे,शासनाने घालुन दीलेल्या नियमांनी बील आकारणी न करता अव्वाच्या सव्वा बिले पाठविने , ज्यांची मोटर ३एच.पी.ची आहे त्यांना ५ एच.पी. व जांची ५ एच.पी. आहे त्यांना ७.५ एच.पी. ची वीज बिल आकारणी व ज्यांची मोटारच अनेक वर्षापासुन बंद आहे त्यांना ही वीज बिल येत आहे .तसेच ज्या शेतकऱ्यांची वीज बिल थकबाकी नाही त्याचा ही वीज प्रवाह बंद केला जात आहे .तर काही शेतकरी बांधवांच्या शेतपंपास वीज मीटर नसतानाही खोटे रिडिंग दाखवुन युनिट नुसार वीज बिल आकारणी केली जात आहे हे तात्काळ थांबवून भोंडवे यांनी डी.पी. वरील चुकीची पाठविलेली बिले वगळता उर्वरीत बिलापैकी ८०ते ८५टक्के चालु वीज बिल वसुली झालेली असेल ती डी.पी . त्वरीत चालु करणे, चुकीची बिले त्वरीत नियमानुसार दुरुस्त करने.,अनेक वर्षापासुन बंद असलेल्या मोटारींचा सर्व्हे करून चुकीची बिले त्वरीत रद्द करणे,तसेच कोराना काळातील २ वर्षाची वीज बिले माफ करुन उर्वरीत वीज बिल भरण्यासाठी १ वर्षाची मुदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आपले वीजबिल वापरानुसार योग्य शासन नियमानुसार आकारलेले, अवास्तव व अंदाजे नसलेले ,शेतकऱ्यांवर अन्याय न करणारे आहे असे तपासून व कोरोना काळातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था विचारात घेऊन ,बिल भरलेले असतानाही वीज न तोडता, कायद्याचा व अधिकाराचा योग्य वापर करावा अन्यथा या विरुद्ध चक्री आंदोलन करण्यात येणार आहे – संदीप भोंडवे,हवेली तालुकाध्यक्ष भाजपा

पेरणे येथील सहाय्यक अभियंता अंकुश मोरे यांना चक्री आंदोलनाचे निवेदन देताना भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!